महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गॅस सिलिंडरच्या भडक्याने माय-लेकीचा होरपळून मृत्यू

06:03 AM Nov 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खोलीत गॅस साठल्याने आगीची दुर्घटना

Advertisement

प्रतिनिधी/ वास्को

Advertisement

स्वयंपाक घरात गॅस गळती होऊन आगीचा भडका उडाल्याने गरोदर महिलेसह तिच्या आईचाही अंत होण्याची हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी नवेवाडे वास्को भागात घडली. गॅस शेगडीचे बटन चुकून चालूच राहिल्याने घरात गॅस जमा झाला आणि आगीचा भडका उडाला असा संशय आहे. मयत महिलेचे नाव शिवानी राजावत (वय 26) असे आहे तर तिच्या आईचे नाव जयदेवी चौहान (वय 50) असे आहे. हे कुटुंब मूळ ग्वाल्हेर, मध्यप्रदेश येथील आहे.

यासंबंधी वास्को पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच माय-लेकीचा मृत्यू झाला होता. नवेवाडे वास्कोतील संतोषी माता मंदिराच्या सभामंडपामागे असलेल्या तीन मजली इमारतीमधील पहिल्या मजल्यावर ही आग दुर्घटना घडली. मयत शिवानी ही साडे चार महिन्यांची गरोदर होती. तिच्या सोबतीला तिची आई नुकतीच आली होती. या दोघींचेही मृतदेह मडगावच्या दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये शवचिकित्सेसाठी पाठवण्यात आलेले आहेत.

स्फोटाचा आवाज झाल्याने शेजाऱ्यांनी घेतली धाव

स्थानिक नगरसेवक सुदेश भोसले व या इमारतीत राहणाऱ्या काही कुटुंबांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजावत दाम्पत्य चार महिन्यांपूर्वीच या इमारतीत भाड्याने राहायला आले होते. नवरा अनुरागसिंग राजावत हा नौदलाचा कर्मचारी आहे. तो रात्रपाळीला ड्युटीवर गेला होता. त्यामुळे घरात त्याची पत्नी व सासू ही दोघेच होती. मुलगी गरोदर असल्याने तिला सोबत देण्यासाठी काही दिवसांपूर्वीच जयदेवी ग्वाल्हेरहून आली होती. सकाळी शिवानी ही चहासाठी दूध आणण्यासाठी इमारतीखाली असलेल्या दुकानावर आली होती. ती दूध घेऊन गेल्यानंतर लगेच ती राहात असलेल्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये स्फोट झाल्याचा आवाज झाला. या आवाजाने शेजारी त्वरित बाहेर आले. प्रारंभी कुठे काय झाले त्यांना कळले नाही. मात्र संशयाने त्यांनी राजावत राहात असलेल्या फ्लॅटकडे धाव घेतली असता दोन्ही महिला आगीच्या भडक्यात होरपळून जमिनीवर पडलेल्या असल्याचे दिसून आले. शेजाऱ्यांनी पाणी मारून त्यांना वाचवण्याचा निष्फळ प्रयत्न केला. आगीच्या भडक्यात त्यांना तत्काळ मृत्यू आला.

स्वयंपाक घरात गॅस साठल्यानेच भडका उडाला

मयत शिवानी हिने आणलेली दुधाची पिशवी ओट्यावरच होती. गॅसही पेटलेला नव्हता. त्यामुळे कुणीच गॅस पेटवला नव्हता हे स्पष्ट होते. परंतु तिने किंवा तिच्या आईने काही वेळ आधीच गॅस सुरू केलेला असावा व गॅसच्या शेगडीचा बटन बंद करण्यास ती विसरली असावी. त्यामुळे त्या स्वंयपाक घरात गॅस भरून राहिला. त्यामुळे दोघांपैकी एकीने जेव्हा लाईटरने गॅस पेटवण्याचा प्रयत्न केला किंवा उजेडासाठी विजेचा बटन दाबला तेव्हा भरलेल्या गॅसने पेट घेतला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.  गॅस सिलिंडर किंवा शेगडीबाबत या कुटुंबाची यापूर्वी कोणतीही तक्रार नव्हती. मात्र, गॅस सिलिंडर पूर्णपणे रिकामा झाला होता. प्रत्यक्षदर्शी कोणीच नसल्याने ही घटना नेमकी कशी घडली याबाबत कुणीच काही सांगू शकत नाही. त्यामुळे पोलीस संबंधीत गॅस कंपनीच्या मदतीने या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. ज्या स्वयंपाक खोलीत आगीचा भडका उडाला त्या खोलीत कुठेही काहीही घडलेले नाही. ही खोली तसेच गॅस सिलिंडर, शेगडी व इतर साहित्य सुरक्षित आहे. आगीच्या स्फोटाने या बंद खोलीच्या खिडकीची तावदाने फुटलेली मात्र दिसून आली. त्यामुळे खोलीत भरलेल्या गॅसने पेट घेतल्यानेच भडका उडाल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे.

दुर्दैवी माय लेक,जावई ग्वाल्हेरला निघणार होती

शेजाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अधिक माहितीनुसार पती-पत्नी व जयदेवी चौहान कालच ग्वाल्हेरला जाण्यासाठी बाहेर पडणार होती. पतीने रजा टाकली होती. त्यांनी निघण्यासाठी बॅगाही भरून ठेवल्या होत्या. मात्र, दिवस उजाडताच दुर्दैवी घटना घडली. या घटनेचे वृत्त नवेवाडेत पसरताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. यावेळी जमलेल्या लोकांनी हळहळ व्यक्त केली.

यापूर्वीही वास्कोत गॅसच्या भडक्याने दुर्घटना घडल्या होत्या

18 वर्षांपूर्वी अशीच एक दुर्घटना नवेवाडेच्या शेजारील शांतानगर भागात एका गल्लीत घडली होती. गॅस गळतीमुळे घरात साठून राहिलेला गॅस वीजेचे बटन दाबताच पेटला होता. त्या दुर्घटनेत वयस्क भाऊ व बहीण अशा दोघांना होरपळून मृत्यू आला होता. वीस वर्षांपूर्वी बोगमाळो भागात एका खोलीत असाच गॅसचा भडका उडून भिंत कोसळली होती. त्यात एका युवकाचा मृत्यू झाला होता. जवळपास वीस वर्षांपूर्वी बायणा भागात शेट्टी कुटुंबाने आपल्याच घरात गॅस लिकेज

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article