For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खोट्या 'नेरेटिव्ह' विरोधातील माझी लढाई सुरूच राहणार’; गणेश चतुर्थीनिमित्त गोमंतकीयांना शुभेच्छा देताना अमित पाटकरांचा भाजपवर निशाणा

05:39 PM Sep 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
खोट्या  नेरेटिव्ह  विरोधातील माझी लढाई सुरूच राहणार’  गणेश चतुर्थीनिमित्त गोमंतकीयांना शुभेच्छा देताना अमित पाटकरांचा भाजपवर निशाणा
Advertisement

पणजी : गेल्या साडेचार वर्षांपासून भाजपकडून कथितपणे तयार करण्यात आलेल्या ‘खोट्या कथानका’विरोधात आपण लढा देत असल्याचे गोवा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावरील पोस्टद्वारे पाटकर यांनी गोवा भाजप आणि त्याच्याशी संबंधित ‘स्लीपर सेल्स’वर जोरदार टीका केली.

Advertisement

आपण हा संघर्ष संघटनेच्या अंतर्गत तसेच सार्वजनिक व्यासपीठावर कोणतीही भीती न बाळगता केला असल्याचे पाटकर यांनी म्हटले आहे. या काळात कोणतीही सबब न सांगता किंवा सहानुभूतीची अपेक्षा न करता आपण सत्याची बाजू मांडल्याचा दावा त्यांनी केला.

सत्याची बाजू मांडण्याची गरज असताना शांत राहिलेल्या काही व्यक्ती आता या प्रकरणातून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही पाटकर यांनी केला. अशा व्यक्तींच्या सहानुभूतीची किंवा विश्वासार्हतेच्या प्रमाणपत्रांची आपल्याला गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

‘गोवा पाहत आहे. सत्याला उशीर होऊ शकतो, मात्र सत्याचा नेहमीच विजय होतो,’ असे पाटकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

गोव्यासाठीची आपली लढाई पुढेही सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोव्याच्या जनतेसाठी आणि सत्यासाठी आपण ठामपणे उभे राहणार असून, राजकीय सोयीसाठी जनतेची दिशाभूल करणाऱ्यांविरोधात आपला संघर्ष कायम राहील, असे पाटकर यांनी म्हटले.

दरम्यान, गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देताना पाटकर यांनी सर्व गोमंतकीयांना मंगलमय सणाच्या शुभेच्छा दिल्या. ‘गणपती बाप्पा मोरया!’ असा जयघोष करत त्यांनी आपल्या पोस्टचा समारोप केला.

पाटकर यांच्या या वक्तव्यामुळे भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा एकदा धार येण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.