For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आचरा पिरावाडी वैकुंठभूमी स्मशानभूमी सौरदिव्यांनी उजळली

11:18 AM Nov 22, 2025 IST | अनुजा कुडतरकर
आचरा पिरावाडी वैकुंठभूमी स्मशानभूमी सौरदिव्यांनी उजळली
Advertisement

मुजफ्फर मुजावर यांनी लावले स्वखर्चाने सौरदीप

Advertisement

आचरा | प्रतिनिधी

असं म्हटलं जातं की ,पैसा खिश्यात असून उपयोग नाही तर तो देण्याची दानत असली पाहिजे हाच दातृत्वाचा गुण मुज्जफर(चावल) मुजावर यांनी जोपासला आहे. मुजफ्फर मुजावर यांनी पिरावाडी गावची गरज ओळखून स्मशानभूमीमध्ये आपल्या स्वखर्चाने पाच सौरदीप लावत आचरा पिरावाडी वैकुंठभूमी (स्मशानभूमी) उजळून टाकली आहे.पिरावाडी येथे रात्रीच्या वेळी अंधारामुळे प्रेत दहनाच्यावेळी अनेक अडचणी येत होत्या. गरज ओळखून त्यांनी हे सौरदिप स्मशानभूमीत लावण्याचे ठरविले. हे काम करत असताना त्यांनी जात धर्म कधीच पाहिला नाही. तर पाहिली ती फक्त माणुसकी. या त्यांच्या कार्यात त्यांना स्थानिक ग्रामस्थ श्रीकांत उर्फ बंडया पराडकर, रत्नाकर सारंग, नितिन तारी, दर्शन तारी, निशिकांत कमळे, नारायण उर्फ आबा होडेकर,श्री जितेंद्र धुरी, श्री दिनेश कांदळगावकर, आदित्य धुरी, मोहन परब, किशोर तळवडकर यांनी मेहनत घेत हे सौरदिप पिरावाडी स्मशानभूमीमध्ये उभारण्याचं काम केलं आणि त्यामुळे आज पिरावाडी स्मशानभूमी प्रकाशाने झगमगून गेली आहे. या त्यांच्या कार्यासाठी समस्त पिरावाडी ग्रामस्थांनी मुजावर यांचे आभार व्यक्त केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.