For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Youth dies struck by lightning मासे, चिकन चुलीवर शिजत होतं अन् अचानक वीज कोसळली...तरुणाचा करुण अंत

07:09 PM Jun 01, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
youth dies struck by lightning मासे  चिकन चुलीवर शिजत होतं अन् अचानक वीज कोसळली   तरुणाचा करुण अंत
Advertisement

एका प्रकल्पाच्या बॅकवॉटरजवळ पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणांवर अचानक वीज कोसळल्याने राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथील एकाचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.  भुदरगड तालुक्यातील अरळगुंडी गावात ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार जुलपेवाडी धरणावर पर्यटनासाठी गेलेल्या युवकांच्यावर वीज पडून एक तरुण जागीच ठार झाला तर दोन युवक गंभीर जखमी झाले .जखमीला खाजगी रुग्णालयात हलवण्यात असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

झुलपेवाडी प्रकल्पाच्या बॅक वॉटरला पार्टीसाठी गेलेल्या तरुणांसोबत ही दुर्दैवी घटना घडली. सुदैवाने चौघे जण बचावले. अजीत दत्तात्रय चौगुले (रा. नरतवडे, ता. राधानगरी) असे मृताचे नाव आहे. रोहित राजेंद्र मोरे (रा. खानापूर, ता. भुदरगड) याच्यावर गारगोटी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisement

जेवणाची पार्टी युवकांच्या जीवावर बेतली
रोहित मोरे, दिपक पाटील, आर्दाळ (ता. आजरा) या दोघांसह अन्य एक असे पाच जण झुलपेवाडी प्रकल्पाच्या बॅक वाॅटरला निसर्ग रम्य ठिकाणी पार्टीसाठी गेले होते. दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दुपारी अचानक वातावरण बदलले आणि वळवाच्या साधारण सरी तिथे पडू लागल्या व विजेचा कडकडाट होऊ लागला त्यांनी एका झाडाखालीच जेवणाच्या साहित्यासह आश्रय घेतला. साधारण ३ वाजण्याच्या सुमारास विजेचा जोराचा आवाज झाला. याच दरम्यान तरुणांच्या अंगावर पडली. या घटनेत अजीत चौगुले मृत झाला तर रोहित मोरे जखमी झाला. एक जण पंधरा फूट अंतरावर होता तर दोघे जण पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी गेल्यामुळे बचावले.

उपचारासाठी दाखल

जखमी रोहित मोरे यास उपचारासाठी गारगोटी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान जिल्हा बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी रूग्णालयात भेट देऊन जखमीची विचारपूस केली. रोहितला पाहण्यासाठी रूग्णालयात मोठी गर्दी झाली होती. शवविच्छेदना नंतर रात्री उशिरा अजीतचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मृत अजीत याच्या पश्चात पत्नी, आई- वडील असा परिवार आहे.
दरम्यान भुदरगड घ्या तहसीलदार डॉ अर्चना पाटील यांनी वळीव पाऊस व वीज वार्याचे वातावरण असुन शेतकऱ्यांनी सावध राहुन शेतीतील कामे आटपावीत तसेच आपत्ती कालीन परिस्थिती साठी भुदरगड प्रशासन सज्ज आहे तरीही शेतीतील कामे करताना सावधानता बाळगावी असे आवाहन केले आहे.

Advertisement
Tags :

.