For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुथुटचा येणार आयपीओ, 4 हजार कोटी रुपये उभारणार

06:51 AM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुथुटचा येणार आयपीओ  4 हजार कोटी रुपये उभारणार
Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

Advertisement

मुथुट फिनकॉर्प ही कंपनी येत्या काळात आपला आयपीओ सादर करणार असून याअंतर्गत 4 हजार कोटी रुपये उभारणार आहे. यामध्ये कंपनी ताजे समभाग बाजारात सादर करु शकते. समभागधारकांची मंजुरी, बाजारातील एकंदर स्थिती तसेच नियामकाची मंजुरी या गोष्टींवर आयपीओ उभारणीची प्रक्रिया गतिमान होणार आहे. ही कंपनी केरळममधील आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती

Advertisement

मुथुट फायनान्सचा समभाग बाजारात आधीच सुचीबद्ध झालेला आहे. आता मुथुट फिनकॉर्पचा समभाग सर्व मंजुऱ्या मिळाल्यानंतर सुचीबद्ध होईल. आर्थिक वर्ष 2026 मध्ये कंपनीने 1847 कर पश्चात नफा मिळवलेला आहे. तर  8364 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने मिळवला आहे. मागच्या तिमाहीत कंपनीने करपश्चात 664 कोटींचा नफा तर 3356 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे.

Advertisement
Tags :

.