For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुस्लीम आमदाराने घेतली संस्कृत भाषेत शपथ

06:27 AM Dec 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
मुस्लीम आमदाराने घेतली संस्कृत भाषेत शपथ
Advertisement

भाजपने नाकारली होती उमेदवारी

Advertisement

वृत्तसंस्था/ जयपूर

राजस्थानच्या 16 व्या विधानसभेचे पहिले सत्र बुधवारी सुरू झाले आहे. प्रोटेम स्पीकरनी निवडून आलेल्या आमदारांना शपथ दिली आहे. यादरम्यान डीडवाना मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार युनूस खान यांनी संस्कृत भाषेत शपथ घेत सर्वांना चकित केले आहे. अन्य आमदार जुबेर खान यांनीही संस्कृत भाषेत शपथ घेतली आहे. राजस्थानच्या राजकारणात युनूस खान यांना माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे निकटवर्तीय मानले जाते. डीडवाना मतदारसंघाची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपला रामराम ठोकला होता.

Advertisement

खान यांनी डीडवाना मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत 70 हजार 952 मते मिळविली होती. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार चेतन सिंह चौधरी यांना 2 हजार 392 मतांनी पराभूत केले होते. तर या मतदारसंघात भाजप उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला हेता. डीडवाना मतदारसंघात विजय मिळविल्यावर युनूस खान यानी देशनोकमध्ये करणी मातेचे दर्शन घेतले होते.

Advertisement
Tags :

.