मस्क यांच्या संपत्तीत एका दिवसात मोठी घट
अंदाजे 2,41,700 कोटी रुपयांची घसरण : अन्य अब्जाधीशांच्या संपत्तीवर प्रभाव
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्या संपत्तीत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढ होत आहे. काही काळापूर्वी त्यांची संपत्ती 400 अब्ज डॉलर्सवर पोहोचली होती, त्यानंतर असे मानले जात होते की त्यांची मालमत्ता 500 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाईल, त्यानंतर मस्क पुन्हा इतिहास रचतील. मात्र बुधवारी त्यांच्या मालमत्तेत मोठी घट झाली. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार बुधवारी एलॉन मस्क यांची एकूण संपत्ती 28.4 अब्ज डॉलरने घसरली. जड अंदाजे 2,41,700 कोटी रुपयांची आहे. यापूर्वी असे मानले जात होते की मस्कची संपत्ती 500 अब्ज डॉलर्सचा आकडा पार करेल आणि नवा इतिहास रचेल.
मस्कची निव्वळ संपत्ती किती आहे?
एवढ्या मोठ्या घसरणीनंतर आता एलॉन मस्कची संपत्ती 458 अब्ज डॉलर्स झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून एलॉन मस्कची एकूण संपत्ती 229 अब्ज डॉलरने वाढली आहे. त्याच वेळी, जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस यांची संपत्ती 240 अब्ज डॉलर्स आहे. जेफ बेझोसनंतर मार्क झुकरबर्ग 211 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. बुधवारी त्यांची मालमत्ता 7.69 अब्ज डॉलरने घसरली.
भारतातील श्रीमंतांच्या संपत्तीत वाढ
बुधवारी, जगातील सर्वात मोठ्या श्रीमंत लोकांच्या निव्वळ संपत्तीत घसरण झाली, तर भारतातील सर्वात श्रीमंत आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 17 व्या क्रमांकावर असलेले मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वाढ झाली. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत बुधवारी 72.5 दशलक्ष डॉलर्सची वाढ झाली. त्यानंतर ती 94.7 अब्ज डॉलर झाली.