For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जर्मनीच्या निवडणुकीत मस्क यांचा हस्तक्षेप

06:25 AM Jan 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
जर्मनीच्या निवडणुकीत मस्क यांचा हस्तक्षेप
Advertisement

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांचा आरोप : नॉर्वेच्या पंतप्रधानांकडूनही मस्क लक्ष्य

Advertisement

वृत्तसंस्था/ बर्लिन

टेस्ला अन् एक्सचे प्रमुख इलॉक मस्क हे जगभरातील मुद्द्यांवर मतप्रदर्शन करत असतात. मस्क काही देशांमध्ये उजव्या विचारसरणीच्या पक्षांचे उघडपणे समर्थन करतात. यावरून फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मस्क यांच्यावर टीका केली आहे. मस्क हे अनेक देशांच्या निवडणुकीत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप मॅक्रॉन यांनी केला आहे.

Advertisement

जगातील सर्वात मोठ्या सोशल नेटवर्कांपैकी एकाचा मालक इंटरनॅशनल रिअॅक्शनरी मूव्हमेंटचे समर्थन करेल आणि जर्मनी समवेत अनेक देशांच्या निवडणुकांमध्ये थेट हस्तक्षेप करेल असा विचारही 10 वर्षांपूर्वी कुणी केला नव्हता असे वक्तव्य मॅक्रॉन यांनी केले आहे. तर मस्क यांनी या प्रकरणी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मस्क हे फ्रान्समध्ये उजव्या विचारसरणीच्या पक्षाला पाठिंबा देणार की नाही हे देखील स्पष्ट नाही. तर मस्क यांच्या विरोधात एखाद्या जागतिक नेत्याने वक्तव्य करण्याची ही पहिली वेळ नाही.

युरोपीय देशांच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये मस्क यांच्या वक्तव्यांमुळे अत्यंत चिंतेत आहे. लोकशाही आणि सहकारी देशांमध्ये अशा गोष्टी घडू नयेत असे नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांनी सोमवारीच म्हटले हेत. मस्क आणि मॅक्रॉन यांचे संबंध चांगले राहिले आहेत. मागील महिन्यात नोट्रेडम कॅथेड्रल पुन्हा खुले करताना मॅक्रॉन यांनी मस्क यांना आमंत्रित केले होते.

मस्क हे ट्रोल : जर्मन चॅन्सेलर

जर्मनीतील सत्तारुढ पक्षाने मस्क यांच्यावर संघीय निवडणुकीला प्रभावित करण्याचा आरोप केला आहे. जर्मन चॅन्सेलल ओलाफ शोल्ज यांनी मस्क यांना ट्रोल संबोधिले होते. मी मस्क यांचे समर्थन करत नाही तसेच ट्रोलला प्रोत्साहनही देत नसल्याचे शोल्ज यांनी म्हटले होते.

जर्मनीत फेब्रुवारीत निवडणूक

जर्मनीमध्ये फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीकरता मस्क हे उघडपणे तेथील विरोधी पक्ष अल्टरनेटिव्ह फर ड्यूशलँडचे (एएफडी) समर्थन करत आहेत. जर्मनीला केवळ एएफडीच वाचवू शकते. एएफडीच देशासाठी आशेचा किरण आहे. हा पक्ष जर्मनीला उज्ज्वल भविष्य देऊ शकतो असे मस्क यांनी म्हटले आहे. मस्क हे आता एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एएफडीचे चॅन्सेलर पदासाठीचे उमेदवार एलिस वीडेल यांच्यासोबत लाइव्ह कार्यक्रम करण्याचे नियोजन करत आहेत. यामुळे जर्मनीतील सत्तारुढ पक्ष मस्क यांना सातत्याने विरोध करत आहे. मस्क यांच्या प्रचारमोहिमेमुळे कुठलाही प्रभाव पडणार नाही. जर्मनीत समजुतदार अन् सभ्य लोक अधिक आहेत असे जर्मन सरकारच्या एका प्रवक्त्याने महटले आहे.

मस्क यांचे महत्त्व वाढले

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर इलॉन मस्क यांचे महत्त्व वाढलेआहे. मस्क हे ट्रम्प प्रशासनात विवेक रामास्वामी यांच्यासोबत मिळून डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएंसी म्हणजेच डीओजीई सांभाळणार आहेत. या विभागाचा उद्देश शासकीय खर्च एक तृतीयांशपर्यंत कमी करणे आहे. ट्रम्प अध्यक्ष होणार असले तरीही खरी शक्ती मस्क यांच्या हातात आल्याचा आरोप डेमोक्रेटिक पार्टीच्या खासदारांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.