मस्कच्या माजी प्रेयसीची ‘ग्रोक’विरुद्ध तक्रार दाखल
06:33 AM Jan 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
Advertisement
टेस्ला आणि एक्स (पूर्वीचे ट्विटर) मालक एलोन मस्क यांच्या माजी प्रेयसी अॅशले सेंट क्लेअर यांनी ‘एक्स-एआय’विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. ‘एक्स-एआय’च्या चॅटबॉट, ग्रोकने वापरकर्त्यांना तिचे आक्षेपार्ह डीपफेक फोटो तयार करण्याची परवानगी दिल्यामुळे तिला मानसिक त्रास आणि अपमान झाल्याचा आरोप तिने केला आहे. लेखिका आणि राजकीय रणनीतीकार, 27 वर्षीय अॅशले सेंट क्लेअर हिने न्यूयॉर्क शहरातील राज्य मुख्य न्यायालयात खटला दाखल केला. ‘ग्रोक’ने तयार केलेल्या फोटोमध्ये ती 14 वर्षांची असतानाचा तिचा जुना फोटो बदलण्यात आला होता, असा दावा तिने केला. सदर फोटोमध्ये ती बिकिनी घातलेली दिसत होती. याव्यतिरिक्त इतर फोटोंमध्ये तिला लैंगिक स्थितीत प्रौढ महिला म्हणून दाखवण्यात आले आहे. तसेच स्वस्तिक चिन्हासह बिकिनी घातल्याचेही दाखवले आहे.
Advertisement
Advertisement