For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मस्कचा अॅपल-ओपनएआय भागीदारीला विरोध

06:22 AM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
मस्कचा अॅपल ओपनएआय भागीदारीला विरोध
Advertisement

वैयक्तिक डाटा सुरक्षिततेवरुन घेतला निर्णय : अन्यथा अॅपल उत्पादनांवर बंदी घालू

Advertisement

नवी दिल्ली :

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांनी अॅपलच्या ओपनएआय सोबतच्या भागीदारीला विरोध केला आहे. मस्कने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले अॅपलने चॅटजीपीटी निर्मात्या ओपनएआयसोबत भागीदारीची घोषणा केली आहे ज्यामुळे त्यांच्या उपकरणांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अधिक सुधारली जाईल. कंपनीच्या या निर्णयामुळे त्यांचा वैयक्तिक डेटा सुरक्षित राहणार नाही, अशी भीती लोकांना आहे. तसेच कार्यालयात अॅपल उत्पादनांवर बंदी घालण्यात येणार असल्याचा सूचक इशाराही मस्क यांनी यादरम्यान दिला आहे.

Advertisement

त्याचवेळी त्यांनी लिहिले की, कंपनीत येणाऱ्या पाहुण्यांकडे अॅपलचे उपकरण असल्यास ते उपकरण एंट्री गेटवरच तपासले जाईल. याशिवाय हे उपकरण तेथे जमा केले जाईल. दुसऱ्या पोस्टमध्ये, मस्कने अॅपलचा समाचार घेतला आणि लिहिले की हे स्पष्टपणे मूर्खपणाचे आहे की अॅपल स्वत: चे एआय तयार करण्यास पुरेसे हुशार नाही आणि तरीही ते म्हणत आहे की ते आपल्या सुरक्षिततेचे आणि गोपनीयतेचे रक्षण करेल!

तुमचा डेटा ओपनएआयकडे सोपवल्यानंतर खरोखर काय होत आहे याची अॅपलला कल्पना नाही. ते तुम्हाला धोक्यात घालत आहेत, असेही मस्क यांनी म्हटले आहे.

2016 मध्ये एफबीआयला दहशतवादी सय्यद फारुखकडून आयफोन सापडला होता. तो अनलॉक करण्यासाठी एजन्सीने अॅपलची मदत मागितली होती पण अॅपलने त्यास नकार दिला होता, याची आठवण मस्क यांनी करुन दिली.

Advertisement
Tags :

.