For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ठरलेलं लग्न, ब्रेकअप आणि आता अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा...पलाश मुच्छलचा नवा वाद

01:18 PM May 06, 2026 IST | NEETA POTDAR
ठरलेलं लग्न  ब्रेकअप आणि आता अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा   पलाश मुच्छलचा नवा वाद
Palash mucchal creates new controversy
Advertisement

Palash Muchhal Controversy News | संगीतकार पलाश मुच्छल हे नाव काही काळापूर्वी बातम्यांच्या केंद्रस्थानी होते. प्रेम, लग्न आणि ब्रेकअप अशा बातम्यांच्या मथळ्यात पलाशने बराच काळ घालवला.  भारतीय महिला क्रिकेटपटू( indian womens Cricketer) स्मृती मानधना हिच्याशी विवाह मोडल्यानंतर चर्चेत आलेला संगीतकार पलाश मुच्छल आता पुन्हा एका मोठ्या वादात अडकला आहे. पलाशविरोधात सांगली येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  विज्ञान प्रकाश माने (वय ३४, शास्त्रीनगर, सांगली) यांनी जातिवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दिली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पलाशविरोधात विरोधात ‘ॲट्रॉसिटी’च्या (Scheduled Castes and the Scheduled extent and Tribes (Prevention of Atrocities) Act, 1989) कलमाखाली गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना २२ नोव्हेंबर २०२५ रोजी घडली.

Advertisement

पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना
2025  साली नोव्हेंबर महिन्यात सांगली शहरातच भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना व संगीतकार पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता ;पण तो काही कारणांनी रद्द झाला. यामागे पलाशचे प्रेमप्रकरण होते असाही अंदाज व्यक्त केला जात होता. हे प्रेमप्रकरण उघडकीस आल्यानंतर स्मृती मानधनाने लग्नास नकार दिला अशीही चर्चा होती.  पलाश - स्मृती लग्नाचा ड्रामा बराच काळ सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनला होता. तक्रारदार विज्ञान माने यांनी जानेवारी महिन्यात पलाशविरोधात फसवणुकीची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे केली होती. यानंतर आता पुन्हा माने यांनी पलाशविरोधात जातिवाचक शिविगाळ केल्याची तक्रार केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पलाश मुच्छलने  २०२५ मध्ये तक्रारदार विज्ञान माने यांची भेट घेतली होती . माने यांच्याकडून मुच्छलने चित्रपट निर्मितीसाठी (Film Procuction) २५ लाख रुपये घेतले होते. यानंतर  २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सांगली ते आष्टा रस्त्यावरील टोल नाका परिसरात विज्ञान माने यांनी पलाश मुच्छलकडे २५ लाखांची मागणी केली होती. याप्रसंगी पलाश मुच्छल याने माने यांना जातिवाचक शिवीगाळ केल्याचे माने यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी पलाशविरोधात अनुसूचित जाती व जमाती अधिनियम २०१२ चे कलम ३ (१), भारतीय न्याय संहिता कलम ३५१ (२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी उपाधीक्षक संदीप भागवत तपास करत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.