महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुश्रीफ आणि के. पी. यांनी मला नेहमीच फसवलं...आगामी विधानसभा लढवणारच!

04:57 PM Mar 01, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

ए. वाय. पाटील यांची कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात घोषणा

सरवडे प्रतिनिधी

माझ्या राजकीय जीवनात नेहमी पक्ष वाढी साठी व सर्व सामान्य कार्यर्त्याला मोठा करण्यासाठी घरावर तुळशी पत्र ठेवून काम केले. पक्ष व कार्यकर्ता मोठा करण्यासाठी दिवस रात्र राबलो. हसन मुश्रीफ व के. पी. पाटील यांनी मला विधान सभा व बिद्री कारखाना अध्यक्ष पदाचा वेळोवेळी शब्द देत फसवले व माझे राजकारण संपविण्याचे काम केले. परंतु आता निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आगामी विधान सभा निवडणूक लढवणारच असे प्रतिपादन ए. वाय. पाटील यांनी केले.

Advertisement

सोळाकूर (ता. राधानगरी) येथील अजित पवार राष्ट्रवादीच्या कार्य कार्यकर्त्याच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते .
पाटील पुढे म्हणाले, बिद्री निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सर्व सामान्य कार्यकर्ते माझ्या पाठीशी राहिले. परंतु ज्यांना पदे देवून मोठे केले. त्यांनी माझा विश्वासघात केला. या लोकांना जनता माफ करणार नाही. राजकारणात चढ उतार होत असतात. यापुढे स्वाभिमानी कार्यकर्त्यांना घेऊन जोमाने कार्यरत राहणार आहे.

Advertisement

यावेळी शिवाजी पाटील, प्रकाश पवार, राजू कवडे, मानसिंग पाटील, महादेव कोथळकर, नेताजी पाटील नंदूभाऊ पाटील, विलास हळदे, नामदेव मुसळे आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी डी. बी .पाटील, भगवान पातले ,मोहन पाटील ,के. डी.चौगले, दिपक पाटील,अमर पाटील, विजय तौदकर, बाळासो धोंड यांच्यासह राधानगरी व भुदरगड तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत रामराव इंगळे यांनी केले. आभार संग्राम कदम यांनी मानले.

 

Advertisement
Next Article