For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुशीरचे द्वितशक हुकले

06:22 AM Sep 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुशीरचे द्वितशक हुकले
Advertisement

सैनीची फलंदाजीनंतर गोलंदाजीतही चमक

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

भारत ‘ब’ संघाच्या नवदीप सैनीने नवीन चेंडूवर आपले पराक्रम दाखविल्याने बेंगळूर येथे चालू असलेल्या दुलीप ट्रॉफी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी भारत ‘अ’ संघास 2 बाद 134 धावांवर रोखण्यास मोलाची मदत झाली. त्यापूर्वी सैनीने साथ दिल्याने मुशीर खानला शानदार 181 धावांची खेळी करता आली. त्याच्या जोरावर भारत ‘ब’ संघाने पहिल्या डावात 321 धावा केल्या. सध्या के. एल. राहुल आणि रियान पराग क्रीझवर असून भारत ‘अ’ 187 धावांनी पिछाडीवर आहे.

Advertisement

2021 च्या ऑस्ट्रेलियातील मालिकेपासून भारतीय संघाबाहेर असलेल्या सैनीने भारत ‘अ’ कर्णधार शुभमन गील आणि सलामीवीर मयांक अग्रवाल यांना बाद करून उल्लेखनीय प्रभाव पाडला. गील 25 धावांवर बाद झाला, तर पुनरागमन करणारा अग्रवाल 36 धावांवर झेल देऊन परतला. रिषभ पंतने डावीकडे नेत्रदीपक सूर मारून झेल पकडत अग्रवालला माघारी पाठवले. गील आणि अग्रवाल यांची पहिल्या यष्टीसाठीची भागीदारी सैनीने चहापानाच्या आधी तोडली.

सध्या क्रीझवर असलेल्या के. एल. राहुल आणि पराग यांना सैनी, मुकेश कुमार आणि नितीशकुमार रे•ाr या वेगवान त्रिकुटाच्या आव्हानांचा सामना करावा लागला. खेळपट्टीनेही वेगवान गोलंदाजांना भरीव मदत दिली, त्यामुळे धावा काढणे कठीण झाले होते. राहुलची सुऊवात संथ होती, त्याने पहिली धाव घेण्यासाठी 14 चेंडू घेतले आणि नितीशने मुकेशच्या चेंडूवर राहुलला तीन धावांवर असताना झेल सोडून जीवदान दिले. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या परागला परिस्थितीनुसार त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीवर अंकुश ठेवावा लागला. या दोघांनी आतापर्यंत तिसऱ्या यष्टीसाठी 68 धावांची नाबाद भागीदारी केली आहे.

त्यापूर्वी मुशीरने पहिल्या दिवसाची चमकदार कामगिरी चालू ठेवत त्याच्या गुरुवारच्या धावसंख्येमध्ये आणखी 76 धावांची भर घातली. उपाहारापर्यंत त्याची सैनीसोबतची भागीदारी टिकली. कुलदीप यादवच्या चेंडूवर परागने झेल घेतल्याने मुशीरचा 484 मिनिटांचा डाव संपला. मुशीर आणि सैनी यांच्यातील 205 धावांची भागीदारी ही दुलीप ट्रॉफीच्या इतिहासातील आठव्या यष्टीसाठीची सर्वोच्च ठरली आहे. 2010 मध्ये अभिषेक नायर आणि रमेश पोवार यांनी केलेल्या 197 धावांच्या भागीदारीचा उच्चांक त्यांनी मोडला. भारत ‘ब’ संघाचा डाव आटोपण्यात आकाश दीपने 60 धावांत चार बळी घेऊन मोलाचा वाटा उचलला.

संक्षिप्त धावसंख्या : भारत ‘ब’ पहिला डाव 116 षटकांत सर्व बाद 321 (यशस्वी जैस्वाल 30, मुशीर खान 181, नवदीप सैनी 56, आकाश दीप 4-60) भारत ‘अ’ पहिला डाव 35 षटकांत 2 बाद 134 (मयांक अग्रवाल 36, रियान पराग नाबाद 27, के. एल. राहुल नाबाद 23; नवदीप सैनी 2-36).

Advertisement
Tags :

.