महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

झारखंड मुक्ती मोर्चाचाही मुर्मूना पाठिंबा

07:00 AM Jul 15, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रांची : झारखंड राज्यातील सत्ताधीश पक्ष झारखंड मुक्ती मोर्चाने भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार दौपदी मुर्मू यांना पाठिंबा घोषित केला आहे. त्यामुळे मुर्मू ही निवडणूक निश्चितपणे जिंकणार असा विश्वास व्यक्त होत आहे. मुर्मू यांच्या रुपाने प्रथमच एक आदिवासी महिला राष्ट्रपती बनणार आहे. त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत, असे प्रतिपादन झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांनी केले आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या सर्व आमदार आणि खासदारांनी 18 जुलैला होणाऱया राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मुर्मूंना मतदान करावे, असे आवाहन झारखंड मुक्ती मोर्चाने केले आहे. झारखंडमध्ये सध्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचे संयुक्त सरकार आहे. काँग्रेसने विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article