कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Shri Krishna Janmashtami 2025: मुरगूडात उद्या प्रथमच रंगणार दहीहंडी स्पर्धा

06:28 PM Aug 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रथमच होणाऱ्या स्पर्धेसाठी ग्रामस्थांत कमालीचे औत्सुक्य

Advertisement

By : रविंद्र शिंदे

Advertisement

मुरगूड : मुरगूडात पहिल्यांदाच होणाऱ्या दहीहंडी स्पर्धेसाठीची तयारी पूर्ण झाली असून मुरगूडसह परिसराला या स्पर्धेविषयी प्रचंड औत्सुक्य निर्माण झाले आहे. कन्या शाळेच्या पटांगणावर या स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षागॅलरी तयार करण्यात आली आहे. सुरक्षेची सर्व काळजी घेऊन उत्साहात या स्पर्धा पार पाडण्यासाठी संयोजन कमिटी रात्रंदिवस कष्ट करत आहे.

उद्या रविवार (दि. १७ ऑगस्ट) रोजी सायंकाळी चार वाजता मंडलिक प्रेमी शिवसेनेच्यावतीने या स्पर्धा होत आहेत. मुरगूडात प्रथमच दहीहंडी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. स्पर्धेत जिंकणाऱ्या संघाला १ लाख रूपयांचे रोख बक्षिस मिळणार आहे. सहभागी प्रत्येक गोविंदा पथकावर प्रोत्साहनपर अन्य बक्षिसांचाही वर्षाव होणार आहे. पहिल्याच प्रयत्नात सहा थर लावून सलामी देणा-या गोविंदा पथकाला ११ हजार रूपयाचे पारितोषीक देण्यात येणार आहे.

बक्षिस पटकावण्यासाठी गोविंदा पथकांची चुरस रंगणार आहे. जिल्ह्यासह राज्यभरातून अनेक गोविंदा पथके स्पर्धेत येणार आहेत. माजी खासदार संजय मंडलिक व पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरिक्षक विरेंद्र मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडणार आहे. आरोग्य मंत्री व पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश क्षिरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार जयश्रीताई जाधव, सत्यजित उर्फ नाना कदम व शारंगधर देशमुख, सुजीत चव्हाण यांच्यासह जिल्यातील शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेच्या नियोजनासाठी अरुण मेंडके, देवेन राऊत, मनोज ढोबळे, धीरज सातवेकर, महेश ओतारी, संग्राम डवरी, कृष्णात पोवार, पंकज मेंडके, अनिकेत बेनके, विशाल कांबळे, संग्राम भोसले, सुखदेव पाटील, पुरुषोत्तम देसाई, प्रशांत सिद्धेश्वर, अजिंक्य अर्जुने श्रावण कळांद्रे, जया सूर्यवंशी, सुरेश परीट, पृथ्वीराज आस्वले हे संयोजन कमिटीचे सदस्य कष्ट घेत आहेत.

सुरक्षेसाठी विशेष उपाय

सर्वात वरच्या थरावर चढून दहिहंडी फोडणाऱ्या गोविंदाच्या सुरक्षेसाठी विशेष उपाय केले जातील. सर्व गोविदांना १० लाख रूपयापर्यंतचे अपघाती विमा कवच असणार आहे. जखमी गोविंदावर तत्परतेने उपचार करण्यासाठी समीट अॅडव्हेंचर आणि हिल रायडर अॅडव्हेंचरचे कार्यकर्ते तसेच ग्रामीण रूग्णालय मुरगूड व मुरगूड नगरपरिषद यांच्या रूग्णवाहिकांसह डॉक्टराचे पथक सज्ज असेल.

Advertisement
Tags :
@KOLHAPUR_NEWS#hasan mushrif#murgud#prakash abitkar#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediakrushnjanmashtamiShri Krishna JanmashtamiShri Krishna Janmashtami 2025
Next Article