For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेशपुरीत दोघांवर खुनी हल्ला

12:26 PM May 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
गणेशपुरीत दोघांवर खुनी हल्ला
Advertisement

जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक : प्राणघातक हल्ला करून चौघांचे पालायन,म्हापसा पोलीस आरोपींच्या शोधात

Advertisement

म्हापसा : म्हापसा-गणेशपुरी येथे गुरुवारी पहाटे 3.30 वाजण्याच्या दरम्यान झालेल्या प्राणघातक खुनी हल्ल्यात अहमद देवडी व संदेश साळकर हे युवक जबर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लोखंडी सळ्या, दंडुके आदी हत्यारांनी वार करण्यात आले असून दोघांनाही अगोदर म्हापसा जिल्हा आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने नंतर त्यांना गोमॅकोत दाखल करण्यात आले आहे. याबाबत म्हापसा पोलीस स्थानकाचे उपअधीक्षक संदेश चोडणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये यापूर्वीच भांडण झाले होते. काल गणेशपुरी टाकीजवळ हे सर्वजण होते. तेथे एकमेकात वाद सुरू झाला. चौघाही जणांमध्ये शाब्दिक चकमक झाली. नंतर आर. के. व अन्य त्याच्या साथीदारांनी अहमद व संदेश याला लोखंडी हत्यारांनी मारहाण केली. आरोपींची ओळख पटली असून फिर्यादीच्या कुटुंबियांनी आर. के व अन्य तिघांविरोधात तक्रार नोंद केली आहे. तक्रारीला अनुसरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे चोडणकर म्हणाले.

अहमदची प्रकृती चिंताजनक

Advertisement

अहमदची नातेवाईक बरखा देवडी हिने सांगितले की, अहमद व संदेश साळकर पहाटे घरी येत असताना म्हापसा गृहनिर्माण वसाहत येथील आर. के. नामक इसम व अन्य तिघांनी मिळून अहमदवर लोखंडी सळ्यांनी वार केले. त्यात त्याला बरीच जखम झाली असून मेंदुला मार बसला असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असतानाच त्यांना गोमॅकोत दाखल करण्यात आले असून अहमदची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे, अशी माहिती बरखा यांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी भांडण

दोन दिवसांपूर्वी आर.के. ने शिविगाळ केली असल्याने पोलिसांनी त्याला अटक करून कोठडीत टाकले होते. त्या रागाने हा हल्ला झाला असावा असे बरखा देवडी म्हणाल्या. अहमदवर एक शस्त्रक्रिया झाली असून अन्य एक शस्त्रक्रिया रात्री करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. साळकर यांच्यावरही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अहमदचे वडील खैसाल देवडी म्हणाले की, पोलिसांनी घटनास्थळावरून तीन भ्रमणध्वनी तसेच लोखंडी सळ्या जप्त केल्या आहेत. म्हापसा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. निरीक्षक प्रशल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :

.