For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हुबळीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

06:21 AM May 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
हुबळीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक
Advertisement

पोलिसांच्या ताब्यातून पलायन करण्याच्या प्रयत्नात असताना गोळीबार

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केलेल्या नराधमाला पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. पोलिसांच्या ताब्यातून सुटका करून पलायनाचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी गोळीबार करून त्याला ताब्यात घेतले. हुबळी येथे ही घटना घडली आहे. सद्दाम असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर धारवाडमधील सरकारी इस्पितळात प्रथमोपचार करून किम्स इस्पितळात हलविण्यात आले.

Advertisement

आरोपी सद्दाम हुसेन याने अल्पवयीन मुलीशी मैत्री जमवून तिच्यावर अत्याचार केला. मुलीच्या पोटात वेदना होऊ लागल्याने तिच्या आईने तिला हॉस्पिटलमध्ये नेले. यावेळी मुलगी गर्भवती असल्याचे डॉक्टरांकडून समजल्याने पीडित मुलीला किम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याविषयी समजताच सद्दामने मुलीला फोन करून पोलिसांना याविषयी माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलीच्या आईने हुबळीच्या नवनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तातडीने तपास हाती घेत पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी सुतगट्टी येथे शुक्रवारी रात्री गेले. त्यांनी सद्दामला ताब्यात घेतले. आरोपीची वैद्यकीय तपासणी, ठसे आणि इतर माहिती जमा करण्यासाठी पोलीस त्याला रात्री 12:30 वाजता सुतगट्टी येथे नेत होते. त्यावेळी त्याने सुटका करून घेण्यासाठी बटन चाकूने पोलिसांवर हल्ला करून पलायनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी झाडून अटक केली, अशी माहिती धारवाड पोलीस आयुक्त रेणुका सुकुमार यांनी दिली.

विविध संघटनांकडून आंदोलन

या प्रकरणाविषयी माहिती मिळताच अनेक संघटनांनी शुक्रवारी रात्री हुबळीच्या नवनगर पोलीस स्थानकासमोर आंदोलन करून संताप व्यक्त केला. आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.

Advertisement
Tags :

.