महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गंभीर मारहाणीत महिलेचा खून! बोरगाव पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपीस अद्याप अटक नाही

12:14 PM Sep 07, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

देशमुखनगर वार्ताहर

नागठाणे (ता. सातारा) येथे गुरुवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास नागठाणे हद्दीत बावडीवर ऑईल मिल शेजारी माझी आई कोरी मिशन शौकत भोसले (वय 39 वर्षे रा. नागठाणे ता. सातारा) ही काही एक ऐकत नसल्याने तिला अर्धनग्न करून तिचे पाय शर्टाने बांधून, दगडाने राहुल उर्फ शेऱ्या प्रकाश चव्हाण (वय 35 वर्षे रा. लिंब, ता. सातारा) याने तिच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, कानावर, शरीरावर ठिकठिकाणी दगडाने गंभीर मारहाण करून खून केला आहे. याबाबतची फिर्याद जानवर शौकत भोसले (वय 23 रा. नागठाणे) बोरगाव पोलिसांत दिली आहे.

Advertisement

पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, कोरी मिशन शौकत भोसले ही महिला कोणाचे काही ऐकत नसल्याच्या कारणावरुन तिला अर्धनग्न करत तिला मारहाण करण्यात आली. दगडाने झालेल्या गंभीर मारहाणीत कोरी मिशन शौकत भोसले हिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी राहुल उर्फ शेऱ्या प्रकाश चव्हाण वय 35 रा. लिंब याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अद्याप अटक झालेली नाही. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे अधिक तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
Borgaon policeBorgaon police the accusedMurder woman
Next Article