For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मणिपूरमध्ये महिलेसह दोघांची हत्या उघड

07:00 AM Nov 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
मणिपूरमध्ये महिलेसह दोघांची हत्या उघड
Advertisement

नव्या घटनेनंतर पुन्हा तणाव

Advertisement

वृत्तसंस्था /इंफाळ

मणिपूर पोलिसांनी कांगचूप परिसरातून दोन मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण राज्यात पुन्हा खळबळ उडाली आहे. सदर मृतदेह एक महिलेचा तर दुसरा पुरुषाचा असल्याची माहिती देण्यात आली. दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हे मृतदेह कुकी समुदायातील अपहृत लोकांचे असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील तैरेनपोकपी भागात एका मध्यमवयीन महिलेचा डोक्मयात गोळी असलेला मृतदेह सापडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दुसरा मृतदेह स्थानिक लोकांना सापडला असून मृताच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती. तसेच हात पाठीमागे बांधलेले होते आणि त्याच्या डोक्मयावरही गोळ्यांच्या जखमा दिसून येत होत्या. या हत्यांच्या नव्या प्रकरणांमुळे परिसरात पुन्हा तणाव आणि भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.