For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Crime | तमिळनाडूच्या प्रवाशाचा खून; २४ तासात दोन आरोपी जेरबंद

11:50 AM Jun 13, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
solapur crime   तमिळनाडूच्या प्रवाशाचा खून  २४ तासात दोन आरोपी जेरबंद
Advertisement

बसस्थानकावर तमिळनाडू येथील नागरिकाचा खून

Advertisement

सोलापूर : येथील बसस्थानकावर तमिळनाडू येथील एका ज्येष्ठ नागरिकाचा खून करून फरार झालेल्या दोन आरोपी व एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला गुन्हा दाखल झाल्यापासून २४ तासाच्या आत फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने ताब्यात घेतले.

बुधवारी फिर्यादी प्रकृती कृष्णाप्रसाद (रा. मुदतमिलनगर, मालुमिचमपट्टी, जि. कोईम्बतुर, तमिळनाडू) यांचे वडील कृष्णाप्रसाद व्ही. हे हैदराबाद येथून सोलापूरमार्गे सातारा येथे जात असताना सोलापूर बसस्थानक येथील फलाट क्र. २३ च्या बाजूस अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून कशाच्या तरी सहायाने अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात आहे.

Advertisement

या गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. फौजदार चावडी पोलिसांनी तांत्रिक तपास करून आरोपींची नावे निष्पन्न केली.

आरोपी कुणाल किसन बँके कांबळे (वय २१, रा. रमाबाई आंबडेकर नगर, न्यु बुधवार पेठ सोलापूर), अमन सुधाकर जेटीथोर इट (वय २१, रा. आम्रपाली चौक, न्यू बुधवार पेठ) यांना अटक केली आहे व विधीसंघर्षग्रस्त बालक याससुध्दा ताब्यात घेतले आहे.

कृष्णाप्रसाद व्ही. यांच्याजवळील पैसे लुटण्याच्या उद्देशाने हा खून झाल्याची माहिती मिळत आहे. ही कारवाई पोलीस अंमलदार अजय चव्हाण, विनायक जाधव, जगदीश हुल्ले, रवी धेंडे, पंकज घाडगे, विनोद पुजारी आदींनी केली.

Advertisement
Tags :

.