महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कांदोळी येथे मातेकडून मुलाचा खून

11:39 AM Jan 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महिलेला अटक करण्यासाठी पोलीस कर्नाटककडे रवाना

Advertisement

म्हापसा : चार वर्षांच्या मुलासह पर्यटक म्हणून सिकेरी कांदोळी येथील एका हॉटेलमध्ये उतरलेल्या महिलेने त्या मुलाचा खून करून मृतदेह बॅगेत भरला आणि बंगळुरूला पळ काढला. मात्र हॉटेलच्या जागरूक कर्मचाऱ्यांमुळे तिच्या या कृत्याचा भांडाफोड झाला आहे. कळंगूट पोलीस तिला अटक करण्यासाठी चित्रदुर्ग कर्नाटक येथे रवाना झाले आहेत. ही महिला शनिवार  6 रोजी सिकेरी येथील एका हॉटेलमध्ये उतरली होती. तिच्यासोबत 4 वर्षांचा मुलगा होता. 8 रोजी सकाळी तिने हॉटेलजवळूनच बंगळुरूसाठी खास टॅक्सी केली होती. जेव्हा तिने हॉटेल सोडले, तेव्हा तिच्यासमवेत तो चार वर्षांचा मुलगा नव्हता. त्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्याला संशय आला. त्याने लगेच कळंगूट पोलिसांना माहिती दिली. कळंगूट पोलिसांनी येऊन तपास केला असता खोलीजवळ रक्ताचे थेंब आढळून आले. पोलिसांनी लगेच तिला घेऊन जाणाऱ्या टॅक्सी चालकाची चौकशी केली असता ती कुठे उतरली याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चित्रदुर्ग पोलिसांना महिलेची माहिती दिली. चित्रदुर्ग पोलिसांनी तपासाची सूत्रे गतीमान करत महिलेला पकडले. तिची झडती घेतली असता तिच्या बॅगमध्ये मुलाचा मृतदेह आढळून आला. या महिलेला आणण्यासाठी कळंगूट पोलीस चित्रदुर्गच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article