पंजाबी गायिका इंदर कौरची हत्या
6 दिवसांपूर्वी झाले होते अपहरण
वृत्तसंस्था/ अमृतसर
पंजाबच्या संगीतक्षेत्राला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. 6 दिवसांपासून बेपत्ता प्रसिद्ध पंजाबी गायिका यशइंदर कौर उर्फ इंदर कौरची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. इंदर कौरचा मृतदेह नीलो कालव्यातून हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हत्येमागे एकतर्फी प्रेम कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.
13 मे रोजी इंदर स्वत:च्या कारमधून बाहेर पडली होती. रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीय चिंतेत पडले होते. यानंतर त्यांनी स्वत:च्या पातळीवर केलेल्या चौकशीत मोगा जिल्ह्dयातील सुखविंदर सिंह उर्फ सुक्खा हा इंदर कौरवर विवाहासाठी दबाव टाकत होता असे कळले होते. इंदर कौरकडून विवाहाचा प्रस्ताव नाकारण्यात आल्यावर संतापलेल्या सुखविंदरने तिच्या हत्येचा कट रचला होता.
सुखविंदर हत्येसाठी कॅनडामधून पंजाबमध्ये पोहोचला होता. त्याने स्वत:च्या सहकाऱ्यांसोबत मिळून इंदरची कार रोखली आणि तिचे अपहरण केले होते. यानंतर आरोपींनी तिची हत्या करत मृतदेह कालव्यात फेकला होता. तर या घटनेनंतर सुखविंदर सिंह हा त्वरित कॅनडात परतला होता.