महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मुकेश सहानी यांच्या पित्याची हत्या

06:35 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बिहारमध्ये खळबळ, मारेकऱ्यांच्या शोधासाठी पथके

Advertisement

वृत्तसंस्था / पाटणा

Advertisement

बिहारमधील विरोधकांच्या आघाडीचा भाग असलेल्या विकासशील इन्सान पक्षाचे नेते मुकेश सहानी यांचे पिता जितन सहानी यांची त्यांच्या घरातच हत्या करण्यात आली आहे. सोमवारी त्यांचा रक्ताने माखलेला मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळून आला. त्यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी बिहार पोलिसांकडून प्रयत्न केले जात असून अनेक पोलिस पथके संभाव्य स्थानी पाठविण्यात आली आहेत.

बिहार राज्यातील दरभंगा शहरातील सुपौल बझार भागात सहानी यांचे घर आहे. याच घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्यावर अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोटात वार केल्याने अतिरक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेमुळे दु:ख व्यक्त पेले असून गुन्हेगारांना सोडणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

तपासाला प्रारंभ

जितन सहानी यांच्या हत्येची माहिती दरभंगा जिल्ह्याचे एसएसपी जगन्नाथ रे•ाr यांनी दिली. घटनेचे वृत्त कळताच त्वरीत पोलिस घटनास्थळी पोहचले असून तपासाला प्रारंभ करण्यात आला आहे. लवकरच गुन्हेगारांना अटक करण्यात येईल. त्यांना कठोरातील कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न प्रशासन करणार आहे, असे आश्वासन जगन्नाथ रे•ाr यांनी नंतर बोलताना दिले.

मुकेश सहानी पाटण्यात

जितन सहानी यांची हत्या झाली तेव्हा मुकेश सहानी मुंबईत होते. ते त्वरित पाटणा येथे पोहचले. नंतर त्यांनी आपल्या घरी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. हत्या झाली तेव्हा जितन सहानी घरात एकटेच होते, अशी माहिती देण्यात आली. ही हत्या व्यक्तीगत वैमनस्यातून झाली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

विरोधकांची राज्यसरकारवर टीका

सहानी यांचा पक्ष विरोधकांच्या आघाडीत आहे. या आघाडीतील प्रमुख पक्ष राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी या हत्येची जबाबदारी राज्य सरकारवर असल्याची टीका केली. रालोआच्या सत्ताकाळात राज्यातील कायदा-सुव्यवस्था स्थिती पूर्णत: बिघडली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनीही या हत्येसाठी राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article