महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेतोडा बगलरस्त्यावर स्थानिकाचा खून

10:16 AM Dec 15, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रस्त्याच्या बाजूला ख•dयात गाढला होता मृतदेह : दारूची बाटली, चप्पलमुळे प्रकार उघडकीस

Advertisement

फोंडा : बेतोडा-बोरी बगलरस्त्याच्या बाजूला काझरवाडा बेतोडा येथील एका स्थानिकाचा मृतदेह ख•dयात गाढलेल्या अवस्थेत आढळल्याची खळबजनक घटना काल गुरूवारी रात्री उघडकीस आली आहे. रवी बाबुसो गावडे (59, काजरवाडा-बेतोडा) अशी मृताची ओळख पटली आहे. सदर प्रकार हा खूनाचा असल्याचा स्थनिकांचा दावा असून रात्री उशिरापर्यंत तणावाची स्थिती होती. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत रवी गावडे याचा मृतदेह रस्त्याच्या रूंदीकरणासाठी मारलेल्या एका ख•यात टाकून त्यावर कागदी पुट्टे व मातीत पुरलेल्या अवस्थेत सापडला. शेजारी दारूची बाटली व त्याची चप्पल आढळल्याने हा प्रकार उघडकीस आला. तो बुधवारी रात्रीपासून बेपत्ता होता. याप्रकरणी घरच्यानी सर्वत्र शोधाशोध केली होती. बगलरस्त्यावरील एका सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये बुधवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास तो रस्त्यावरून जात असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. घटनास्थळावर तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

Advertisement

हिट अॅन्ड रन प्रकरणाचा संशय

ख•यात टाकलेला मृतदेह पेपर पुट्ट्याने झाकण्यात आलेला होता. त्यावर नंतर माती टाकून पुरण्यात आलेला आहे. मयत हा काजरवाडा येथील असून तो रोज या वाटेवरून ये-जा करीत असे. जवळच्या एका दुकानात तो आपल्यासाठी दोन बाटल्या खरेदी करून मस्त गाणी गात आपल्या ओळखीच्या माणसांना हटकून घरी परतण्याचा त्याचा नित्यक्रम होता. एखाद्या वाहनाची धडक बसल्यानंतर तो मृत झाल्याचे कळल्यानंतर लपविण्यासाठी त्याचा मृतदेह पुरण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी सखोल तपास करावा अशी मागणी त्dयाच्या कुटुंबियांनी केली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article