महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डोक्यात हातोडा घालून प्रेयसीचा खून

11:42 AM Nov 29, 2024 IST | Radhika Patil
Murder of girlfriend by hitting her head with a hammer
Advertisement

खंडाळा : 

Advertisement

खंबाटकी घाटात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा पोलिसांनी तपास केल्यानंतर सदर मृतदेह वाकड, पुणे येथील दाखल मिसिंग तक्रारी मधील महिला जयश्री मोरे यांचा असल्याचे उघड झाले. त्यानंतर गुन्हा अधिक तपासासाठी वाकड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. तद्नंतर 12 तासांच्या आतच सदर खुनाचा गुन्हा उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथे सोमवारी, दि. 25 रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. जयश्री विनय मोरे (27, रा. मारुंजी, हिंजवडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून दिनेश पोपट ठोंबरे (32, रा. बहुर, पो. करुंज, ता. मावळ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

Advertisement

पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर मयत जयश्री मोरे पतीपासून विभक्त राहत होती. दिनेश ठोंबरे हा हिंजवडी येथील एका कंपनीत सुपरवायजर असून त्याचे पहिले लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत. दिनेश हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असायचा. दरम्यान, पाच वर्षांपूर्वी दिनेश आणि जयश्री यांची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली.

गेल्या चार वर्षांपासून जयश्री आणि दिनेश हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. जयश्री आणि दिनेश यांचे काही दिवसांपासून विविध कारणांवरून पटत नव्हते. जयश्री नेहमी दिनेशकडे पैशांची मागणी करत वेगळे राहायचे म्हणत होती. रविवारी दि. 24 रोजी दोघेही पुणे येथील भूमकर चौक येथे गाडीत असताना दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दिनेशने गाडीत ठेवलेल्या हातोड्याने जयश्रीच्या डोक्यात वर्मी घाव घातले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जयश्रीचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दिनेश हा सातारा जिह्यातील खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंबाटकी घाटात गाडी घेऊन गेला. तेथे घाटात जयश्रीचा मृतदेह फेकला. त्यानंतर दिनेश पिंपरी- चिंचवडमध्ये परतला. सोमवारी दि. 25 नोव्हेंबर रोजी दिनेश ठोंबरे याने जयश्री बेपत्ता असल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दिली.

दरम्यान, जयश्री यांचे वर्णन असलेल्या महिलेचा मृतदेह मिळाल्याची माहिती वाकड पोलिसांना दिली असता खंडाळा पोलीस व पिंपरी चिंचवड पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली असता यामागील संशयित दिनेश ठोंबरेला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर समोर आले. बनाव करण्यासाठी संशयित दिनेश याने जयश्रीचे तीन वर्षीय मुलाला आळंदीत बेवारस सोडून दिल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी याबाबतची पोस्ट देखील व्हायरल केली होती. ज्यानंतर लहान मुलगा आळंदी पोलिसांना मिळून आला होता. खंडाळा पोलिसांचे सहकार्याने वाकड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून अवघ्या 12 तासांत गुह्याची उकल करून या प्रकरणी दिनेश याला अटक केली.

सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, सहायक निरीक्षक सुभाष चव्हाण, उपनिरीक्षक अनिरुध्द सावर्डे, भारत माने, श्रेणी उपनिरीक्षक बिभीषण कन्हेरकर, पोलीस अंमलदार वंदु गिरे, नामदेव वडेकर, रामचंद्र तळपे, तात्यासाहेब शिंदे, सौदागर लामतुरे, कौंतेय खराडे यांच्या पथकाने ही पुढील कारवाई यशस्वी केली.

खंडाळा पोलिसांच्या दूरदृष्टीने पटली मृतदेहाची ओळख... लागला गुह्याचा छडा

खंबाटकी घाटामध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह दिसून येत असल्याबाबत एका प्रवाशाने पोलीस कंट्रोलला 112 नंबरला कॉल करून सांगितले. त्यानंतर खंडाळा पोलिसांनी खंबाटकी घाटात धाव घेत पोलीस कर्मचारी व खंडाळा तालुका रेस्क्यु टीमच्या साह्याने मृतदेह वर काढण्यात आला. त्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या आदेशान्वये पोलीस उप अधीक्षक राहुल धस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, खंडाळा पोलीस निरीक्षक सुनील शेळके, . पो. नि. संतोष म्हस्के, पो. . संजय जाधव, संजय पोळ, शरद तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार नितीन महांगरे, अमित चव्हाण यांनी दूरदृष्टी दाखवत मिसींग व्यक्तींबद्दल ऑनलाईन तपासणी केली असता मिळते जुळते वर्णनाची महिला वाकड येथून बेपत्ता असल्याबाबत माहिती मिळाली.

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article