महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ग्रा. पं. माजी अध्यक्षांच्या पतीचा खून

11:12 AM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एकसंबा येथील घटना : हत्येचे कारण गुलदस्त्यात : दगडाने डोक्यात वार

Advertisement

वार्ताहर /एकसंबा

Advertisement

एकसंबा येथील ग्राम पंचायत माजी अध्यक्षांच्या पतीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी 17 रोजी सकाळी बिरेश्वरनगरात उघडकीस आली. महांतेश श्रीमंत कुरणी (वय 48) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदलगा पोलीस ठाण्यातर्फे पंचनामा करण्यात आला असून सदर प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. हत्येचे कारण गुलदस्त्यात असून या घटनेमुळे परिसरात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या घटनेविषयी अधिक माहिती अशी,सोमवारी सकाळी बिरेश्वरनगर येथे राहणाऱ्या व्यक्तींना एका व्यक्तीचा मृतदेह पडल्याचे आढळून आले. सदर माहिती गावातील पुढाऱ्यांमार्फत सदलगा पोलिसांना कळविण्यात आली. सकाळी घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन स्थानिकांची विचारपूस केली.

दरम्यान, रविवारी रात्री यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रम पाहून रात्री 2 च्या सुमारास अनेकजण घरी परतले. त्यावेळी त्या ठिकाणी काहीच नव्हते, असे स्थानिकांनी सांगितले. यामुळे सदर घटना पहाटे घडली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. सदलग्याचे फौजदार बिरादार, सीपीआय, एसपी व साहाय्यक पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या नातेवाईकांशी या घटनेबाबत विचारपूस करण्यात आली.  सदर बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी सदर भाग सिल केला होता. दुपारी सारी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून खुनाचे नेमके कारण पुढील तपासाअंती स्पष्ट होणार आहे. मृताच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. एसपी रामनगौडा बसरगी, पीएसआय शिवराज बिरादार, सीपीआय विश्वनाथ चौगुले यांच्यासह पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article