For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देविदास कोनाडकर यांचा खूनच

12:23 PM May 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
देविदास कोनाडकर यांचा खूनच
Advertisement

धारगळ येथील अपघात प्रकरणी तपासात निष्पन्न : उत्तर प्रदेशातील दोघांना अटक : कलम 302 अंतर्गत गुन्हा नेंद,पेडणे पोलिसांकडून तपास

Advertisement

पेडणे : दाडाचीवाडी धारगळ येथील देविदास चंद्रकांत कोनाडकर  (49) दाडाचीवाडी, धारगळ पेडणे यांचा अपघाती मृत्यू नसून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पेडणे पोलीस स्थानकात ‘हिट अँड रन’ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. देविदास चंद्रकांत कोनाडकर या ठिकाणी मृतावस्थेत आढळून आले होते. दरम्यान, हा खुनाचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या प्रकरणी आयपीसी कलम 302 अंतर्गत गुन्हा नोंद करून दोघा संशयित आरोपींना पेडणे पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी दिली. पेडणे उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सुऊवातीला पेडणे पोलिसांनी स्थानिक लोकांच्या साहाय्याने मालवाहू वाहन क्र. जी.ए.-03-एन- 3662 यामध्ये असलेल्या संशयितांना पकडले. रविवारी सकाळी 11 वा. सदर संशयित आरोपींनी आपली टेम्पो रिक्षा रस्त्याच्या वळणावरच धोकादायक स्थितीत उभी केली होती व त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. त्यावेळी देवीदास कोनाडकरही उपस्थित होते व त्यांनी सदर रिक्षा टेम्पोच्या वाहन चालकाला जाब विचारला असता त्यावर त्याने उद्धट उत्तरे दिली. त्यानंतर देवीदास कोनाडकर स्कूटरने तेथून निघाले. संशयितांनी त्यांच्या स्कूटरचा पाठलाग करून दाडचीवाडी धारगळ पेडणे येथे येताच देवीदास यांच्या स्कूटरला संशयिताने आपल्या ताब्यातील मालवाहू टेम्पो रिक्षाची जोरदार धडक दिली व काही अंतरावर फरफटत नेले व संशयित आरोपी पळून गेले. याप्रकरणी पेडणे पोलिसांनी सदर मालवाहू टेम्पो रिक्षाचा चालक मोहित कुमार प्रेमपाल सिंग (19) व अभिषेक कुमार (20) रा. विल, बादशापूर बुलंद शहर, उत्तर प्रदेश या संशयित आरोपींना अटक कली असून त्यांची चौकशी केली असता संशयितांनी गुन्हा कबूल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

संशयितांच्या मुसक्या आवळल्या

Advertisement

मोपा पोलीस निरीक्षक नारायण चिमुलकर, पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे, उपनिरीक्षक नवनीत गोलतेकर, आशिष परब, प्रवीण सीमेपुऊषकर यांच्या पथकाने सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजच्या आधारे तपास करून स्थानिक लोकांच्या सहकार्याने जंगल भागात शोध घेऊन करून संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या. उत्तर गोवा अधीक्षक अक्षत कौशल आणि पेडणे उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या देखरेखीखाली पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे व सहकाऱ्यांच्या मदतीने पुढील तपास सुरू आहे.

सखोल चौकशी करा : आमदार जीत आरोलकर

मंगळवारी सकाळी मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी या खून प्रकरणी पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. या खून प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी धारगळ येथील नागरिक तसेच देविदास कोनाडकर यांचा मित्र परिवार पोलीस स्थानकावर जमा झाले होते.

तपासात हयगय नको : आमदार प्रवीण आर्लेकर

दरम्यान, पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर हे राज्याबाहेर आहेत. त्यांनी या खून प्रकरणी उपअधीक्षक दळवी व पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. तपासात कोणतीही हयगय करू नका, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या, असे सूत्रांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.