महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची हत्या, बेघराला आश्रय देणे अंगलट

06:45 AM Jan 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हातोड्याने 50 वार करत घेतला जीव

Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

Advertisement

अमेरिकेच्या जॉर्जियामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. 25 वर्षीय विद्यार्थी विवेक सैनीची हत्या एका बेघर इसमाने केली आहे. त्याने विवेकच्या डोक्यावर हातोड्याने 50 वार केले आहेत.

विवेक एका फूड मार्टमध्ये काम करत होता, स्टोअरबाहेर येणाऱ्या एका बेघराला विवेक आणि अन्य कर्मचाऱ्यांनी राहण्यासाठी जागा दिली होती. परंतु विवेकने या बेघराला जागा रिकामी करण्यास सांगितल्यावर त्याने संतापून विवेकची हत्या केली आहे. संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

जूलियन फॉकनरचा नावाचा बेघर इसम अनेकदा आमच्या स्टोअरबाहेर बसायचा. विवेक त्याला खायला देत होता. जूलियनला आम्ही राहण्यासाठी उबदार ठिकाण उपलब्ध केले होते. यानंतर जूलियनचे स्टोअरमधील येणे-जाणे वाढले होते. परंतु विवेकने अलिकडेच त्याला अन्यत्र जाण्यास सांगितले होते. यानंतर जूलियनने विवेकवर हल्ला करत त्याची हत्या केली. विवेक दोन वर्षांपूर्वी शिक्षणासाठी अमेरिकेत आला होता, त्याने अलिकडेच मास्टर्सचे शिक्षण पूर्ण केले होते अशी माहिती त्याच्या एका सहकाऱ्याने दिली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article