For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सराईत गुंडांचा दगडाने ठेचून निर्घृण खून

10:09 AM Nov 30, 2023 IST | Kalyani Amanagi
सराईत गुंडांचा दगडाने ठेचून निर्घृण खून
Advertisement

पूर्ववैमनस्यातून खुन, दोघांना अटक .:मेलखड्डा येथील घटना

Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

पूर्ववामानस्यातून सराईत गुंडांचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. शुभम उर्फ पाव अशोक पाटील ( वय 28 रा. रामानंद नगर) असे मृताचे नाव आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास मैल खड्डा येथे ही घटना घडली. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी शुभम मोरे उर्फ बंडा, संग्राम पडळकर या दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, शुभम पाटील व शुभम मोरे या दोघांचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी सोमवारी रात्री शुभम पाटील, शुभम मोरे व संग्राम हे तिघे मेलखंडा येथे दारू पीत बसले होते. या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. दोनही शुभम मध्ये वाद होऊन मारामारी झाली. यावेळी शुभम मोरे व संग्राम ने शुभम पाटील यांच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. दरम्यान मैल खड्डा येथे खून झाल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळली. पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रात्री उशिरा शुभम, संग्राम याना ताब्यात घेतले.

Advertisement
Tags :

.