For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोरेगाववाडी रस्त्यानजीक खून प्रकरणाचा छडा, पोलिसांची जलद कारवाई

06:29 PM Jan 06, 2026 IST | NEETA POTDAR
कोरेगाववाडी रस्त्यानजीक खून प्रकरणाचा छडा  पोलिसांची जलद कारवाई
Advertisement

                               उमरगा पोलिसांनी 24 तासात लावला खुनाचा छडा

Advertisement

धाराशिव उमरगा : उमरगा पोलिसांना शहराच्या बायपास मार्गालगत कोरेगाववाडी रस्त्यानजीक रविवारी सकाळी एका तरुणाचा धारदार हत्यार व दगडाने ठेचून निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली. सकाळी नागरिकांना रस्त्याकडेला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली.

घटनास्थळी पोलीस दाखल होतात प्रथम शर्ट वरील टेलर च्या मार्क वरून तपास करून मयताची आळोख पटवली त्यानंतर उमरगा पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या अनुषंगाने अवघ्या २४ तासाच्या आत तपास लावला.

Advertisement

तपासामध्ये मयताची बायको हिचे एका इसमाबरोबर असलेल्या अनैतिक संबंधातून त्याचा झाल्याचे निष्पन्न झाले असून पोलीस पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी व त्यांची टीम करीत आहेत

Advertisement
Tags :

.