For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पूर्ववैमनस्यातून डोक्यात सळी घालून खून; सांगलीवाडीतील युवकाचा खून करणाऱ्यास 12 तासात अटक

11:26 AM Apr 04, 2024 IST | Abhijeet Khandekar
पूर्ववैमनस्यातून डोक्यात सळी घालून खून  सांगलीवाडीतील युवकाचा खून करणाऱ्यास 12 तासात अटक
Sangli Crime
Advertisement

खून करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार : एक कॅमेरा पोलिसांसाठी योजनेचा संशयित अटक करण्यासाठी फायदा

सांगली प्रतिनिधी

सांगलीवाडी येथे पूर्ववैमनस्यातून प्रतीक भिमराव गायकवाड या युवकाचा मध्यरात्री घराच्या बाहेर बोलावून त्याच्या डोक्यात लोखंडी सळईने डोक्यात बेदम मारहाण करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. सांगलीवाडी येथील राहुलराजे चौक, हारूगडे प्लॉट येथे हा प्रकार घडला. हा खून रेकॉर्डवरील गुन्हेगार किशोर नामदेवराव कदम वय 43, रा. हारूगडे प्लॉट, राहूलराजे चौक, लक्ष्मीनारायण मंदिराजवळ सांगलीवाडी याने केला होता. त्याला सांगली शहर पोलिसांनी 12 तासात त्याचा पाठलाग करून अटक केली.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, मयत प्रतिक गायकवाड आणि संशयित किशोर नामदेव कदम हे दोघेही दोस्त होते. तसेच प्रतिक आणि किशोर या दोघांना घोडे फिरविण्याचा तसेच घोडागाडीच्या शर्यतीचा नाद होता. यातूनच काही दिवसापुर्वी किशोर आणि प्रतिक यांच्यात वाद झाला होता. हा वाद त्यावेळी जवळ असणाऱ्या मित्रांनी सोडविला होता. पण किशोर कदम याच्या डोक्यात हा राग तसाच होता. मंगळवारी रात्री संशयित कदम हा नशेत होता आणि त्यांने या नशेतच प्रतिक गायकवाडला घराच्या बाहेर बोलावून घेतले आणि जुना राग उकरून काढला त्यातून दोघांत भांडण सुरू झाले यातूनच किशोर कदमने मयत प्रतिक गायकवाड याच्या डोक्यात सळीने जोरदार प्रहार केला त्यानंतरही तो त्याच्यावर प्रहार करत होता. त्यावेळी प्रतिकचे वडिल त्याला वाचवण्यासाठी आले असता किशोरने त्यांनाही ढकलून दिले आणि प्रतिकवर हल्ला सुरूच ठेवला. गंभीर जखमी झालेल्या प्रा†तकने आरडाओरडा केल्यानंतर त्याच्या घरातील तसेच शेजारचे लोक धावत तेथे आले. त्यावेळी ा†कशोर तेथून पळून गेला. गंभीर जखमी अवस्थेत प्रा†तकला सांगलीच्या वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू होण्यापुर्वीच तो मयत झाला होता.

मयत प्रा†तक ा†भमराव गायकवाड याच्या आई प्रा†मला ा†भमराव गायकवाड (वय 50) रा. सांगलीवाडी यांनी संशयित किशोर कदम याच्याविरूध्द ा†फर्याद ा†दली आहे. त्यानुसार संशा†यत ा†कशोर कदमच्या†वरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सांगली शहर पा†लसांनी तात्काळ याचा तपास सुरू केला. दरम्यान हा किशोर कदम हा कृष्णाकाठी लपून बसलेली माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हा प्रकटीकरण शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाले त्यानंतर त्यांनी त्याठिकाणी सापळा लावला. त्यावेळी तो पळून जात होता. पण पोलीसांनी त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली आहे.

Advertisement

बारा तासात संशयित अटकेत
याबाबत अधिक माहिती देताना सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले की, या खुनाची माहिती मिळताच संशयिताचा शोध सुरू करण्यात आला होता. पण तो आढळून येत नव्हता. त्यानंतर मात्र तो कृष्णाकाठी एका शेतात लपल्याचे समजल्यावर त्याठिकाणी पोलीस फौजफाटा पाठविला आणि त्याठिकाणी त्याला पकडले आणि 12 तासात त्याला अटक केली आहे.

एक कॅमेरा पोलिसांसाठी त्याचा संशयित अटकेसाठी उपयोग
सांगली शहर पोलिसांनी एक कॅमेरा पोलिसांसाठी ही पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची योजना प्रभावीपणे राबविली होती. या योजनेतंर्गत सांगलीवाडी येथे एकाने सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता. या कॅमेरामध्ये या खुनाचे सर्व चित्रिकरण झाले आहे त्यामुळे संशयित पकडण्यासाठी या कॅमेराचा उपयोग झाला असल्याचेही सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.