For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जन्मदात्या आईचा मुलाकडून बंदुकीची गोळी झाडून खून

10:53 AM Jan 15, 2026 IST | अनुजा कुडतरकर
जन्मदात्या आईचा मुलाकडून बंदुकीची गोळी झाडून खून
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 85
Advertisement

अणसूर -मडकिलवाडी येथील घटना: मकर संक्रांतीच्या रात्री घडलेल्या घटनेने खळबळ

Advertisement

वेंगुर्ले। प्रतिनिधी

अणसूर मडकिलवाडी येथील उमेश वासुदेव सरमळकर याने वासंती वासुदेव सरमळकर (65) या आपल्या जन्मदात्या आईचा गोळी झाडून खून केला. ही दुर्दैवी घटना बुधवारी रात्री 8.30 वाजता राहत्या घरासमोर घडली. याप्रकरणी वेंगुर्ले पोलिसात संशयित आरोपी उमेश वासुदेव सरमळकर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.अणसूर -मडकिलवाडी येथील उमेश वासुदेव सरमळकर याने वेगवेगळ्या बँका व बचत गट यांचे कर्ज काढलेले होते. त्या कारणावरून त्याची आई वासंती वासुदेव सरमळकर व मुलगा उमेश वासुदेव सरमळकर यांच्यात वारंवार भांडणे होत होती. काल बुधवारी त्याची आई वासंती वासुदेव सरमळकर अंगणात खुर्चीवर बसलेली असताना आरोपी मुलगा उमेश वासुदेव सरमळकर याने आपल्या घराच्या छपरावर चढून हातातील बंदुकीने अंगणात बसलेल्या आपल्या आईवर गोळी झाडली. ही गोळी त्याची आई वासंती सरमळकर हिच्या छातीला लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या खून प्रकरणी वेंगुर्ले पोलिसात मयत व्यक्तीची सून जागृती सरमळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उमेश सरमळकर याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.