For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम दिवशी मुरली श्रीशंकर, रोहित यांची चमक

06:02 AM Jun 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम दिवशी मुरली श्रीशंकर  रोहित यांची चमक
Advertisement

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

Advertisement

अभूतपूर्व पाच राष्ट्रीय विक्रमांची नोंद करणाऱ्या रोमांचक राष्ट्रीय आंतर-राज्य वरिष्ठ अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपची रविवारी येथे सांगता झाली. स्टार लांब उडीपटू मुरली श्रीशंकर आणि भालाफेकपटू रोहित यादव यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

श्रीशंकरने युवा खेळाडू शाहनवाझ खानवर वर्चस्व गाजवले आणि चौथ्या फेरीत 8.38 मीटर उडी मारून सुवर्णपदक पटकावले. रविवारची त्याची ही कामगिरी या हंगामात आतापर्यंत आशियाई खेळाडूंमध्ये सर्वोत्तम आणि जगात सातवी सर्वोत्तम ठरली. दुसरीकडे, रोहितने 87.05 मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.

Advertisement

अंतिम फेरीतील आपल्या थ्रोमध्ये सुवर्णपदक पटकावले. या हंगामाच्या सुरुवातीला 92.62 मीटरची नोंद करणाऱ्या श्रीलंकेचा उदयोन्मुख खेळाडू रुमेश पाथिरागेनंतर, रविवारी केलेली त्याची कामगिरी ही या हंगामातील आतापर्यंतची जगातील दुसरी सर्वात सर्वोत्तम कामगिरी ठरली. आपल्या सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीच्या बाबतीत रोहित नीरज चोप्रा (90.23 मीटर) आणि किशोर जेना (87.54 मीटर) यांच्यानंतर, भारतीयांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.

केरळचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 27 वर्षीय श्रीशंकरने शेवटच्या फेरीत पॉल जंप करण्यापूर्वी 8 मीटर आणि त्याहून अधिक अंतराचे पाच प्रयत्न केले. त्याच्या प्रयत्नांची मालिका 8.06, 8.00, 8.21, 8.38, 8.26, एफ अशी होती. उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 18 वर्षीय खानने पाचव्या फेरीत 8.30 मीटरची उडी मारून रौप्यपदक पटकावले. तथापि, तो उर्वरित पाच प्रयत्नांपैकी एकाही प्रयत्नात 8 मीटरचा टप्पा ओलांडू शकला नाही. तामिळनाडूचा पी. डेव्हिड 8.06 मीटरसह तिसऱ्या स्थानी होता. पदक विजेत्या सर्व खेळाडूंनी आशियाई खेळांसाठी निश्चित केलेले 7.91 मीटरचे पात्रता अंतर ओलांडत पात्रता मिळविली आहे.

Advertisement
Tags :

.