For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुरली श्रीशंकरला सिम्बाइन क्लासिकमध्ये सुवर्ण

06:00 AM Apr 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुरली श्रीशंकरला सिम्बाइन क्लासिकमध्ये सुवर्ण
Advertisement

वृत्तसंस्था/चेन्नई

Advertisement

भारतीय लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने मंगळवारी द.आफ्रिकेतील प्रिटोरिया येथे झालेल्या ‘सिम्बाइन क्लासिक‘ स्पर्धेत 8.12 मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह विजेतेपद पटकावले. दक्षिण आफ्रिकेत आयोजित ‘वर्ल्ड अॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर‘च्या ‘सिल्व्हर‘ स्तरावरील ही स्पर्धा होती. यजमान देशाचा खेळाडू दिवान मॅन्युएल हा 8 मीटरचा टप्पा ओलांडणारा एकमेव अन्य उडीपटू ठरला. केरळच्या या खेळाडूची या हंगामातील ही केवळ दुसरीच स्पर्धा होती. या महिन्याच्या सुरुवातीलाच, बंगळूर येथे झालेल्या ‘इंडियन अॅथलेटिक्स सिरीज‘मध्ये त्याने 8.15 मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले होते. मंगळवारची ही कामगिरी म्हणजे श्रीशंकरने आपल्या सर्वोत्तम क्षमतेपर्यंत पोहोचण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल होते. 27 वर्षीय श्रीशंकरला गुडघ्याच्या दुखापतीमुळे 2024 च्या ऑलिम्पिक स्पर्धेला मुकावे लागले होते. त्याने टोकियो येथील अॅथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली होती, मात्र पात्रतेमध्ये 7.78 मीटरची सर्वोत्तम कामगिरी करूनही त्याला अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नव्हते.

Advertisement
Advertisement
Tags :

.