कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वेंगुर्ल्यात १३ जानेवारीपासून भिंतीचित्र महोत्‍सव

04:13 PM Jan 05, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

वेंगुर्ला नगरपरिषदेचे आयोजन

Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-
माझी वसुंधरा अभियान ४.० व स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत दि. १३ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीमध्‍ये वेंगुर्ला भिंतीचित्र महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. या स्‍पर्धेमधील विजेत्‍यांना प्रथम पारितोषिक रक्‍कम रु. १००००/- , द्वितीय पारितोषिक रक्‍कम रु. ७०००/- व तृतीय पारितोषिक रक्‍कम रु. ५०००/- अशी बक्षिसे ठेवण्‍यात आलेली असून वेंगुर्ला नगरपरिषदेने निश्चित केलेल्‍या अटींची पूर्तता करणे बंधनकारक आहे. तसेच आर्ट डिप्‍लोमाधारक, एटीडी प्रमाणपत्रधारक अथवा प्रवेश घेतलेला विद्यार्थी, कला शाखेचे प्रमाणपत्रधारक अथवा प्रवेश घेतलेले विद्यार्थी या स्‍पर्धेमध्‍ये सहभाग घेवू शकतात. जास्‍तीत जास्‍त विद्यार्थी व कलाकारांनी स्‍पर्धेमध्‍ये सहभागी होवून आपल्‍या कलेचे प्रदर्शन करावे. तसेच स्पर्धेमधे सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी पुर्वा मसुरकर (शहर समन्वयक)९४२१०७४८०० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# vengurla # tarun bharat news# Mural painting festival
Next Article