उघड्यावर कचरा टाकणाऱ्यावर पालिकेकडून कारवाई सुरू
सातारा :
सातारा शहरात घरोघरी कचरा नेण्यासाठी सातारा पालिकेच्या कचरा गाड्या आहेत. तरीही काही नागरिक जाणीवपूर्वक रस्त्यावर कचरा टाकत असतात. त्यामुळे सातारा शहरातील काही ठिकाण हे कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळते. हेच चित्र हटवण्यासाठी सातारा पालिकेने पुन्हा एकदा कचरा उघड्यावर टाकणाऱ्या वर दंडाची कारवाई सुरू केलेली आहे. जागेवर पावती फाडली जात आहे. त्यामुळे उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना आता सोबत पैशाचे पाकीट घेऊन जावे लागणार आहे.
सातारा शहर हे स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सातारा पालिका नेहमी प्रयत्न करत आहे. घरोघरी तयार होणारा ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी कचरा गाड्या आहेत. दररोज सुमारे सात ते आठ टन कचरा या कचरा गाडीच्या माध्यमातून गोळा करून सोनगाव कचरा डेपोत टाकला जातो. मात्र तरीही सातारा शहरात अनेक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकण्याची प्रथा आजही जपली जात आहे. काहीजण रात्री उशिरा तर काहीजण जाता येता कचऱ्याची पिशवी घेऊन हे रस्त्याकडेला कचरा टाकताना दिसतात. त्यांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे सातारा शहराचे सौंदर्य बाधित होते. विद्रुपीकरण होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी पुन्हा उघड्यावर कचरा टाकणाऱ्या वर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाचे प्रमुख प्रकाश राठोड यांनी एक पथक तयार केले आहे. त्या पथकास कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जिथे कचरा टाकला जातो. तिथेच पथकाचे कर्मचारी उभ्या असतात उघड्यावर कचरा टाकताना जर कोणी नागरिक आढळला तर त्याच्यावर जागेवर दंडाची कारवाई केली जाते. त्यामुळे आता उघड्यावर कचरा टाकाल तर पैशाचे पाकीट सोबत घेऊन जावा दंड भरावा लागतो आहे. अन्यथा घरात तयार होणारा कचरा हा दारात येणाऱ्या कचरागाडीतच टाका दंड होणार नाही. सातारा स्वच्छ राहील त्यामुळे पालिकेच्या या मोहिमेमध्ये उघड्यावर कचरा टाकणारे आता रडारवर आहेत.
यांच्यावर झाली कारवाई
लोणार गल्ली येथे कचरा टाकताना अभिषेक मुन्ना साह याच्यावर कारवाई करून 180 रुपयांची पावती फाडली. तसेच विलास वसंत सोनावणे दिव्यनगरी, दिलीप शिवदास पंतांचा गोट,राजेंद्र चोरगे लोणार गल्ली यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.