कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी महापालिका कटीबद्ध

01:37 PM Dec 16, 2024 IST | Pooja Marathe
Municipality Committed to Better Services for Citizens
Advertisement

प्रशासक एस. कार्तिकेय: महापालिकेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण : वीर जवान व शहीदांच्या कुटूंबियांचा सत्कार

Advertisement

कोल्हापूर
कोल्हापूर शहराला ऐतिहासिक वारसा आहे. कोल्हापूरसारख्या शहरात काम करण्याचे भाग्य लाभले असुन नागरिकांना चांगल्या मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी महापालिका कायम कटीबद्ध राहील, अशी ग्वाही मनपा प्रभारी प्रशासक कार्तिकेयन एस. यांनी दिली. महापालिकेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी झालेल्या ध्वजारोहणाप्रसंगी ते बोलत होते.
महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक कार्तिकेयन एस. यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पुढील काळात कोल्हापूरला जगातील सर्वोत्तम व स्वच्छ शहर बनविण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यानंतर माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याची शपथ घेतली.
कार्तिकेयन एस म्हणाले, शहरासह उपनगरातील नागराकांना मुलभूत सुविधा पुरविणे हे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पहिले कर्तव्य आहे. वेळच्यावेळी कचऱ्याचे व्यवस्थापन झाले पाहीजे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले पाहीजे. यासाठी सर्वांनी मिळून दर्जेदार सुविधांवर भर द्यावा, असे आवाहन केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उपायुक्त साधना पाटील, नेहा आकोडे, स्वाती दुधाणे, उज्वला शिंदे, कलावती मिसाळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, सुनील बिद्रे, प्रशासन अधिकारी आर. व्ही. कांबळे, सुधाकर चलावाड, रमेश मस्कर, एन. एस. पाटील, महादेव फुलारी, आर के पाटील, सुरेश पाटील, विलास साळोखे, जयवंत पवार, प्रशांत पंडत, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, समीर व्याघ्राबरे, संदीप तायडे, यशपालसिंग रजपूत, प्रिती घाटोळे, विश्वास कांबळे आदी उपस्थित होते.

Advertisement

महापालिकेच्यावतीने वीर जवान व शहिदांच्या कुटूंबियांचा सत्का
देशाच्या रक्षणाकरीता बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागात सेवा बजाविताना शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा सत्कार करण्यात आला. महापालिकेच्यावतीने प्रशासक कार्तिकेयन एस. यांच्या हस्ते शाल, रोप व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
यामध्ये जवान निवृत्ती मरळे यांची सून उर्मिला मरळे, जवान लक्ष्मण रावराणे यांची सून स्मिता रावराणे, जवान जयसिंग भोसले यांची पत्नी श्रीमती कांचनदेवी भोसले, कॅप्टन शंकर वालकर यांची वहिनी माणिक वालकर, जवान सुनिल चिले यांचे भाऊ अनिल चिले, मेजर मच्छिंद्र देसाई यांची पत्नी श्रीमती सुनिता देसाई, जवान दिगंबर उलपे यांची आई श्रीमती आनंदी उलपे तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे सेवा बजावित असताना शहीद झालेल्या स्टेशन ऑफिसर भगवान जाधव यांची पत्नी जाई जाधव, फायरमन श्रीकांत पाटील यांची पत्नी अंजनी पाटील, फायरमन दत्तात्रय खामकर यांचा भाऊ शिवाजी खामकर, फायरमन अशोक माने यांची बहिन भाग्यश्री डकरे यांचा सत्कार करण्यात आला.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article