कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महापालिका कर्मचाऱ्यांकडून स्मशानभुमीस 52 हजार शेणी

01:21 PM Dec 16, 2024 IST | Pooja Marathe
Municipal employees donate 52 thousand dung to the crematorium
Advertisement

अखंडपणे उपक्रम राबविण्याचा निर्धार : वर्धापन दिनी उपक्रम
कोल्हापूर

Advertisement

महापालिकेच्या 52 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महापालिका कर्मच्रायांच्यावतीने पंचगंगा स्मशानभुमीस 52 हजार शेणीदाण करण्यात आल्या. प्रभारी प्रशासक कार्तिकेयन एस. यांच्याकडे रविवारी शेणी सुपुर्द करण्यात आल्या. दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त पंचगंगा स्मशानभुमीस महापालिकेचे कर्मचारी शेणी देतात. यापुढेही अखंडपणे शेणीदाण उपक्रम सुरू ठेवणार असल्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला.
महापालिका कर्मचाऱ्याकडून गेली 11 वर्षे अखंडपणे पंचगंगा स्मशानभुमीस शेणी प्रदान करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रथम वर्षी 10 हजार शेणीदाण करण्यात आल्या. कालांतराने याचा आकडा वाढत गेला. दुसऱ्या वर्षी 20 हजार शेणी, तिसऱ्या वर्षी 30 हजार, फायर एक्स्टयुगेशर व भिंतीवरील मोठे घडयाळ व चौथ्या वर्षी 30 हजार शेणी, पाचव्या वर्षी 40 हजार व सहाव्या वर्षी 40 हजार, सातव्या वर्षी 40 हजार शेणी, नवव्या वर्षी 35 हजार, दहाव्यावर्षी 51 हजार व यावर्षीही 52 हजार शेणी सुपूर्द करण्यात आल्या.
पुढील वर्षी याहून अधिक शेणीदान करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाडगे, नगरसचिव सुनील बिद्रे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, एलबीटी अधीक्षक विश्वास कांबळे, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article