For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Local Bodies Election 2025 Date : राज्यातील महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक

05:17 PM Dec 15, 2025 IST | NEETA POTDAR
local bodies election 2025 date   राज्यातील महानगरपालिकेची निवडणूक जाहीर  मतदान अन् मतमोजणी कधी   पाहा संपूर्ण वेळापत्रक
Advertisement

                                        महापालिका निवडणुकांची घोषणा; आचारसंहिता लागू

Advertisement

कोल्हापूर : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मुंबईसह राज्यातील  29 महापालिकांमध्ये १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान, तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू होणार असून ३० डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल. त्यानंतर २ जानेवारी हा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असेल. ३ जानेवारी रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.

Advertisement

आचारसंहिता लागू झाल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या जाहिराती, उद्घाटन कार्यक्रम, नव्या योजना जाहीर करणे तसेच शासकीय यंत्रणांचा प्रचारासाठी वापर करण्यावर निर्बंध असणार आहेत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना केल्या जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

महापालिका निवडणुकांच्या घोषणेमुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून सर्व राजकीय पक्षांकडून उमेदवार निवड, प्रचार रणनीती आणि संघटनात्मक तयारीला सुरुवात झाली आहे. आगामी काळात राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.