Kolhapur Politics | महापालिका निवडणूक जानेवारीतच, तयारीला लागा ; राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या जिल्ह्यातील नेत्यांना सूचना
जानेवारीत महापालिकेची रणधुमाळी
कोल्हापूर : राज्यातील महापालिकांच्या निवडणुका जानेवारी २०२६ मध्येच होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा स्पष्ट सूचना महायुतीच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडून जिल्ह्यातील नेत्यांना देण्यात आल्या आहेत. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही ठिकाणी ओलांडलेल्या ५० टक्के आरक्षणाच्या मयदिबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे, अशा स्थानिक स्वराज्य संस्था वगळता उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, असा ही अंदाज राजकीय वर्तुळातून बांधला जात आहे. कोरोना महामारी, अतिवृष्टी, महापूर, लोकसभा, विधानसभा निवडणूक अशा कारणांनी गेल्या चार ते पाच वर्षापासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या
निवडणूक प्रक्रियेमध्ये होत असलेली दिरंगाई लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रीया पूर्ण करण्याचे आदेश देत यानंतर निवडणुकांसाठी मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
तर जिल्हा परिषदेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची प्रतिक्षा आहे. महापालिका निवडणुकांसाठी आज प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होत आहे. यावर हरकती, सुचना घेऊन त्यावर सुनावणी होवून ५ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. यानंतर महापालिका निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. मनपा निवडणुका जानेवारी पर्यंत कोणत्याही परिस्थितील होतील, अशा सूचना आल्याने मनपा निवडणुका लांबणीवर पडण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे.
मनपा निवडणूक वेळेतच होणार
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रक्रियेत नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे वेळेत होतील. मात्र प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमात दोन वेळा झालेला बदल, जिल्हा परिषद निवडणुकीचा अद्याप कार्यक्रम जाहीर न झाल्यामुळे महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती.
मात्र नुकताच राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडून राज्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उमेदवारांच्या 5 आरक्षणामध्ये पन्नास टक्के मर्यादेचे उल्लंघन केले असल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. यावर न्यायालयात सुनावणी सुरु असून आरक्षण मर्यादेचे उल्लंघन झाल्यास निवडणुका स्थगित करण्याचा इशारा न्यायालयाने दिला आहे.
त्यामुळे आरक्षण मयदिबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय न देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मर्यादेचे उल्लंघन झाले आहे. अशा स्थानिक स्वराज्य संस्था वगळून अन्य संस्थांच्या निवडणुका होतील. अथवा संबंधित संस्थांमध्ये फेरआरक्षण टाकून सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक वेळेत होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
कोल्हापूर मनपात उमेदवार आरक्षणामध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली नाही. २७टक्के आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि १३ टक्के आरक्षण अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या न आहेत. कोल्हापूर महापालिकेसाठी एकूण ४० टक्के आरक्षण टाकण्यात आले आहे.
|
मनपासाठी प्रजासत्ताक दिनापूर्वी मतदान
महापालिका निवडणूक जानेवारी २०२६ पर्यंत दिलेल्या वेळेत होणार असल्याचे संकेत बरिष्ठ पातळीवरुन मिळाले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आता निवडणूक कार्यक्रमाकडेही इच्छुकांचे लक्ष असणार आहे. महापालिकेसाठी प्रजासत्ताक दिनापूर्वी २१ ते २४ जानेवारी दरम्यान मतदान होईल, असेही संकेत बरिष्ठ पातळीवरुन मिळाले आहेत.
आहेत.