महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अडथळे ठरलेले फलक मनपाने हटविले

10:19 AM Nov 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हनुमाननगर, महांतेशनगर येथे कारवाई

Advertisement

बेळगाव : शहरात वाहतुकीला अडथळे ठरणारे, तसेच अनधिकृतरित्या लावण्यात आलेल्या फलकांवर मंगळवारी मनपाकडून कारवाई करण्यात आली. शहरात अनेक ठिकाणी लावण्यात आलेले जाहिरात फलक वाहतुकीसाठी अडचणीचे ठरत आहेत. हनुमाननगर, महांतेशनगर येथे फुटपाथवर लावण्यात आलेले फलक महापालिकेने हटवून रस्ता मोकळा केला. शहरात जाहिरातीचे फलक अडचणीचे ठरत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. हनुमाननगर येथे चुकीच्या पद्धतीने फलक लावण्यात आल्याने फुटपाथ बंद झाला होता. याबद्दल काही नागरिकांनी समाजमाध्यमांवर फोटो टाकून नाराजी व्यक्त केली. याची दखल घेत मंगळवारी महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी अनधिकृत व वाहतुकीसाठी अडथळे ठरत असलेले फलक हटविण्याची सूचना दिली. आरोग्य विभागाकडून मंगळवारी सकाळपासून असे फलक हटविण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली. हनुमाननगर, महांतेशनगर, नेहरुनगर परिसरातील फलक हटविण्यात आले. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article