For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवनियुक्त मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांचे ठाकरे शिवसेनेकडून स्वागत

04:14 PM Apr 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
नवनियुक्त मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांचे ठाकरे शिवसेनेकडून स्वागत
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

सावंतवाडी नगरपरिषदचे नवनियुक्त मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांची आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदाधिकारी यांनी भेट घेऊन पुष्पगुच्छ देत स्वागत केले.ह्यावेळी नवनियुक्त मुख्याधिकारी सौ पाटील यांच्याशी शहरातील विविध समस्यांबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली त्यात शहरात होत असलेल्या रस्त्यांबाबत तसेच पाणीटंचाई अनेक शहरातील ठिकाणी होत असलेली दुर्गंधी गटारे व बरेच रस्त्यांच्या खोदाईमुळे पाण्याची फुटत असलेल्या पाईप लाईन अशा सावंतवाडी शहरातील अनेक समस्यांवर नवनियुक्त मुख्याधिकारी सौ पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच यावर योग्यरीत्या कारवाई करत सर्व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी शिवसेना पदाधिकारी यांना दिले. यावेळी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा ,उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार ,शहर प्रमुख शैलेश गवंडळकर , युवा पदाधिकारी आशिष सुभेदार ग्राहक, संरक्षण कक्ष शहर प्रमुख अजित सांगेलकर ,अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष जावेद शेख ,रश्मी माळवदे ,समीरा खलील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.