महापालिका कर, अर्थ स्थायी समितीची 3 रोजी बैठक
त.भा. प्रतिनिधी/ बेळगाव
महानगरपालिका कर, अर्थ व अपिल स्थायी समितीची बैठक मंगळवार दि. 3 रोजी सकाळी 11.30 वाजता स्थायी समिती सभागृहात अध्यक्ष रमेश मैलुगोळ यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. खाली नमूद केलेल्या विषयांवर बैठकीत चर्चा होणार असल्याचे महापालिकेच्या परिषद सचिवांनी कळविले आहे.
गेल्या 1 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे, महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ऑनलाईन मालमत्ता कर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी आणि देखभाल करण्यासाठी सेमिनल सॉफ्टवेअर लिमिटेड विजापूर यांना दिलेल्या वार्षिक देखभालीची मुदत वाढवून देण्याबाबत, प्रभाग 23 मध्ये ई- आस्ती फाईल्स मंजूर न झाल्याबाबत नगरसेवक जयंत जाधव यांच्या प्रस्तावावर चर्चा, प्रभाग 31 मधील सह्याद्रीनगर आर. एस. क्र. 108 येथील सार्वजनिक उद्यानाचे नामकरण वीर सावरकर करण्याबाबत नगरसेविका वीणा विजापूरे यांच्या प्रस्तावावर चर्चा, तसेच अध्यक्षांच्या परवानगीने अन्य विषयांवरही चर्चा होणार आहे