Miraj : मिरजमध्ये महापालिकेचा अतिक्रमणांविरुद्ध कठोर कारवाईचा पुढाकार
मिरज शहरातील बेकायदेशीर अतिक्रमणांवर महापालिकेचा प्रचंड दडपण
मिरज : शहरातील अनधिकृत अतिक्रमणांवर शनिवारी दुसऱ्या दिवशीही महापालिकेने हातोडा उगारला. विशेष करुन लक्ष्मी मार्केटपासून सराफ रोड, सतारमेकर गल्ली, गणेश तलाव परिसर आणि गांधी चौक परिसरात कारवाई करण्यात आली. महापालिकेकडून अतिक्रमणांवर थेट बुलडोझर लावला जात असल्याचा धसका घेऊन अनेक अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली. महापालिकेने कारवाईत सातत्य ठेवले असून, पुढील काही दिवस ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.
बेकायदेशीर व अनधिकृत अतिक्रमणांच्या विरोधात महापालिका प्रशासनाने आक्रमक भुमिका घेतली आहे. आयुक्त सत्यम गांधी हे स्वतः रस्त्यावर उतरुन अतिक्रमणांवर का-रवाई करीत आहेत. सांगली बरा-`बर रविवारपासून मिरज शहरातही अतिक्रमणांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी लक्ष्मी मार्केट परिसर, बोकड चौक, लोणी बाजार, दत्त चौक, फुलारी लाईन आणि तांदूळ मार्केट परिसरात अतिक्रमणे काढण्यात आली.
दुसऱ्या दिवशी शनिवारीही महा-पालिकेने अतिक्रमणांवर कारवाई सुरूच ठेवली. सराफ कट्टा परिसर, सतारमेकर गल्ली, गणेश तलाब रोड, चर्च रोड, मंगळवार पेठ या भागात दिवसभर कारवाई करण्यात आली. सुरूवातीला अतिक्रमणधारकांना स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात आली. महापालिकेच्या कारवाईचा धसका घेऊन अनेक नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली. दरम्यान, शहरातील अनेक अतिक्रमणांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.