महापालिकेचे बजेट पुढील आठवड्यात
कोल्हापूर :
कोल्हापूर महापालिकेचं वार्षीक बजेट पुढील आठवड्यात सादर केले जाणार आहे. पाणी पट्टी किंवा घरफाळ्यात कोणतीही वाढ न करण्याचे संकेत आहेत. ई सेवा सक्षम करणे, महापालिकेची थकबाकी वसुली, पाणी पुरवठा सूरळीत करणे, रस्त्यांची डागडूजी, कचरा उठाव आणि निर्मुलन, आदीवर भर देणरा हा अर्थ संकल्प असेल असे सुत्रांचे म्हणणे आहे.
महापालिकेचे महसुली उत्पन्न सुमारे 360 कोटी रूपये आहे. आस्थापना खर्च 240 कोटी 85 लाख रुपये आहे. यामध्ये कर्मच्रायांचा पगार, विदयुत खर्च, प्राथमिक शिक्षण, परिवहन, पेन्शन, आदींचा समावेश आहे. देखभाल दुरुस्तीसह इतर खर्च वजा जाता विकास कामासाठी साधारणत: 45 ते 50 कोटी रूपयेच महापालिका शहराच्या विकासकामासाठी खर्च करु शकते. साधारण सात लाख लोकसंख्येच्या शहराच्या सर्वांगिन विकासासाठी हा निधी तोकडा आहे. स्वनिधी तसेच उत्पन्न कमी असले तरी महापालिकेचं बजेटचा आकडा मात्र हजार कोटी रुपयांचा असतो. यामध्ये पाणी पुरवठ्याकडील योजना, ड्रेनेज आणि अमृत योजना, रस्ते बांधकामासाठी आलेला निधी, स्वच्छ भारत अभियानातील निधीचा आकडा दाखवलेला असतो. बहूतांश कामे मागील वर्षीची असतात. तो निधी पुढे पुढे खर्ची पडत असल्याने साडेतिनशे कोटी रुपयांचा स्वनिधी असूनही बजेट मात्र हजार कोटींचे दाखवले जाते.
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रामाणिकपणे घरफाळा सर्वेक्षण तसेच पाणी पुरवठ्यासह इतर विभागांची थकीत वसुली वेळेत होण्याची गरज आहे. जकात नाके बंद झाल्यापासून महापालिका पूर्णपणे राज्य आणि केंद्र सरकारकडून मिळण्राया अनुदानावर अवलंबून आहे. स्वनिधीतून आस्थापना खर्च जाता खूप कमी निधी विकासकामांसाठी मिळतो. तरीही महापालिका प्रशासन काटकसर करत शहरवासीयांवर अतिरिक्त करांचा बोजा टाकण्याचे कटाक्षाने टाळत असते. यंदाही पाणी पुरवठा किंवा घरफाळ्यात कोणतीही वाढ केली जाणार नसल्योच संकेत आहेत. करवाढ न केल्याने उत्पन्न वाढीचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनापुढे असणार आहे.