For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

तक्रार करताच महापालिकेने घेतली माघार

06:05 AM Oct 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
तक्रार करताच महापालिकेने घेतली माघार
Advertisement

युवा समितीच्या पाठपुराव्याला यश : एसआयआरमधील अर्ज स्वीकारले

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेदरम्यान आधारकार्ड जन्म तारखेचा पुरावा म्हणून ग्राह्या धरले नसल्याचे कारण देत बेळगाव उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काही मतदार नोंदणी अर्ज महापालिकेने फेटाळले होते. याची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करताच महापालिकेने माघार घेतल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

बेळगाव उत्तर व दक्षिण मतदारसंघातील अर्ज महापालिकेने फेटाळले होते. मात्र, बेळगाव ग्रामीण मतदारसंघात अशाच प्रकारचे अर्ज तहसीलदार कार्यालयाने स्वीकारल्याने एकाच प्रक्रियेत वेगवेगळे निकष लावले जात असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या हेल्पलाईनद्वारे मतदारयादीत नाव नसलेल्या नागरिकांचे ऑनलाईन अर्ज भरून देण्यात आले होते. हे अर्ज फेटाळल्याने युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी आक्षेप घेत केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगासह बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर महापालिकेने यापूर्वी फेटाळलेले अर्ज स्वीकारले असून संबंधित मतदारांची नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट केली आहेत. युवा समितीच्या पाठपुराव्यामुळे वगळलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मतदार नोंदणी प्रक्रियेत सर्वत्र एकसमान निकष लागू करावेत आणि पात्र नागरिकांना प्रक्रियात्मक विसंगतीमुळे मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागू नये, अशी मागणी युवा समितीच्यावतीने करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.