महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शहरातील मोकाट जनावरे पकडली

10:16 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : शहरामध्ये मोकाट जनावरांमुळे भाजीविक्रेत्यांसह इतरांना त्याचा त्रास होत होता. त्यामुळे महानगरपालिकेच्या पथकाने शुक्रवारी विविध ठिकाणची तीन जनावरे पकडली. त्यांना श्रीनगर येथील गोशाळेमध्ये पाठविण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेने शहरातील मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबविली आहे. चार दिवसांपूर्वी 11 जनावरे पकडली होती. त्यानंतर शुक्रवारी नरगुंदकर भावे चौक, काकतीवेस रोड, कोतवाल गल्ली येथील जनावरे पकडून गोशाळेत पाठविली आहेत. नरगुंदकर भावे चौक येथे जनावरे पकडताना मनपा कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. अचानकपणे ती जनावरे सैरभैर पळू लागली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाही धावाधाव करावी लागली. अखेर या जनावरांना पकडण्यात यश आले आहे. राजू संकन्नावर यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनावरे पकडली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article