For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवबसवनगर येथील फूटपाथवरील कुंड्यांकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष

11:09 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
शिवबसवनगर येथील फूटपाथवरील कुंड्यांकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष
Advertisement

बेळगाव : शिवबसवनगर रोडवरील फूटपाथवर मनपाकडून झाडे लावण्यासाठी कुंड्या ठेवल्या आहेत. पावसाळ्यात त्यामध्ये विविध प्रकारची झाडे लावली होती. मात्र, त्यांच्या संवर्धनाकडे मनपाकडून दुर्लक्ष झाल्याने सदर झाडे वाळून गेली आहेत. सदर कुंड्यांमध्ये तळीरामांकडून दारूच्या बाटल्या ठेवण्यात येत आहेत. महापालिकेने याकडे लक्ष देऊन कुंड्यांमध्ये रोपे लावण्याची मागणी होत आहे. शिवबसवनगर हा भाग शहरातील प्रमुख मार्गांपैकी आहे. या मार्गावर दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. महापालिकेकडून परिसरातील सौंदर्यात भर घालण्यासाठी मार्गाच्या दुतर्फा झाडे लावण्याचे नियोजन केले होते.

Advertisement

त्यानुसार मार्गाच्या दुतर्फा सीसी कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात सदर कुंड्यांमध्ये विविध प्रकारची रोपे लावण्यात आली होती. पावसाळ्यात या झाडांची वाढ झाली होती. मात्र महापालिकेकडून रोपांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष करण्यात आले. कालांतराने झाडे टप्प्याटप्प्याने वाळून गेली. तरीही झाडांच्या संवर्धनाकडे किंवा नवीन रोपे लावण्याकडे मनपाने कानाडोळा केला. आता सदर कुंड्यांमध्ये मद्यपींकडून दारूच्या रिकाम्या बाटल्या टाकण्यात येत आहेत. यामुळे या कुंड्या म्हणजे मद्यपींसाठी दारूच्या रिकाम्या बाटल्या टाकण्याचे ठिकाण झाले आहे. महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना राबवाव्यात. तसेच मार्गावरील कुंड्यांमध्ये पुन्हा रोपे लावून त्यांची देखभाल करण्याची मागणी होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.