भारतनगर येथील घटनास्थळाची मनपाकडून तपासणी
12:28 PM Nov 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : विजेचा धक्का बसून म्हैस दगावल्याची घटना शनिवारी भारतनगर शहापूर येथे घडली होते. डेकोरेटीव्ह पथदीपांच्या वीजवाहिन्या खुल्या असल्याने त्याचा धक्का लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. रविवारी मनपाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून खुल्या वीजवाहिन्यांची तपासणी केली. चरण्यासाठी गेलेल्या म्हशीला वडगाव-शहापूर रस्त्यावरील भारतनगर येथील खुल्या जागेत विजेचा धक्का बसला. यामध्ये शेतकऱ्याचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. महानगरपालिकेच्या पथदीप विभागाच्या गलथान कारभारामुळे म्हशीचा बळी गेल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे रविवारी तातडीने मनपा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. पथदीपाच्या मागील बाजूच्या वीजवाहिन्यांचे तपासणी केली.
Advertisement
Advertisement