For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महापालिकेची 4 नोव्हेंबर रोजी सर्वसाधारण सभा

07:32 AM Oct 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
महापालिकेची 4 नोव्हेंबर रोजी सर्वसाधारण सभा
Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

Advertisement

महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा बुधवार दि. 4 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. लवकरच याबाबतची नोटीस कौन्सिल विभागाकडून महापौर, उपमहापौर, लोकनियुक्त नगरसेवक, सरकार नियुक्त सदस्य व अधिकाऱ्यांना पाठविली जाणार आहे.

बुधवारी सकाळी 11 वाजता महापालिकेच्या मुख्य सभागृहात महापौर प्रीती कामकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत महाजन अहवालाच अंतिम या सरकारच्या निर्णयाला महापालिका बद्ध आहे, असा ठराव मांडण्यात आला होता. त्यामुळे याला म. ए. समितीच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध करत सभात्याग केला. 4 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बेळगावात होणारे सरकारचे विधिमंडळ अधिवेशन, विविध विकासकामे, प्रलंबित प्रस्ताव, पाणीपुरवठा, मालमत्ता कर आदी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर कौन्सिल विभागाकडून तयारी केली जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.